धर्मवीरांचे विचार समाजापुढे पोहोचवा ... डॉ. अरुणाताई बर्गे : चित्रपट मोफत शो ला प्रचंड गर्दी

सातारा : धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार प्रेरणादायी होते. जेवढे जीवन जगले ते हिंदुत्व आणि शिवसेना पक्ष वाढवण्यासाठीच घालवले धर्मवीरांचे विचार समाजापुढे येणे गरजेचे असून ते समाजापुढे पोहोचवावेत असे प्रतिपादन डॉ. अरुणाताई बर्गे यांनी केले. दरम्यान निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे धर्मवीर २ शो सातारकरांसाठी मोफत ठेवला होता त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बर्गे बोलत होत्या. यावेळी संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य मीनाक्षीताई मोरे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद सदस्य प्रवीण पाटील, शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे हे उपस्थित होते.


प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा 'धर्मवीर २' चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील चित्रपट रसिकांसाठी सातारा शिवसेना शहरच्यावतीने चित्रपट  रसिकांना मोफत उपलब्ध करून दिला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. शोचे उद्घाटन फटाक्याची आतशबाजी व ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोस दुग्धाभिषेक घातला. रविवारी दिवसभरातील सेव्हन स्टारचे सात शो हाउसफुल्ल झाले असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी अनेकांनी निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजकारण करत आहेत त्याच प्रकारे निलेश मोरे हे सातारा शहर व परिसरात समाजकारण व गरजूंच्या मदतीला धावून जात असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.


यावेळी शिवसेनेचे अमोल इंगोले, विक्रम यादव, निलेश आपटे, किरण कांबळे, शुभम भिसे, माधुरी धनवडे ,सुषमा जाधव, मेघा चोरगे सारिका पवार,सोनाली सकपाळ,मनोज भोसले,अजिंक्य राजपूत,अमोल खुडे ,प्रथमेश बाबर,यश खत्री ,ओंकार गायकवाड, धीरज संकपाळ, मनोज देवळे, अनिकेत भिसे, शांताराम साठे यांच्यासह सातारा शहरातील सर्व बचत गट महिला मंडळ, तमाम शिवसैनिक व पदाधिकारी आणि इतर नागरिक उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला