चोराडे येथील महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये लाखोंची चोरी

 चोराडे: दि.२१/१०/२०२३ रोजीचे सांयकाळी चोराडे येथील महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर या दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याचे स्क्रू काढून कोणीतरी अज्ञात इसमांनी दुकानात प्रवेश करून दुकानाच्या समोरील उजव्या बाजूस असलेल्या शटरला आतील बाजूने लावलेले नट व बोल्ट काढून शटर उघडून दुकानातील साहित्याची चोरी केली. त्यामध्ये डीजे साऊंड सिस्टिमचे ०२ टॉप आणि ०४ अॅम्प्लिपायर असे साहित्य बाहेर काढून त्यापैकी ०२ टॉप दुकानापाठीमागील बाजूस असलेल्या बिराजी यशवंत जानकर यांच्या शेतातील वैरणीच्या गंजीच्या मागे नेऊन सदर दोन्ही टॉपचे स्क्रू काढून ते खोलून दोन्ही टॉपमधील एकूण ३२ स्पीकर व ०४ अॅम्प्लिपायर असे वरील वर्णनाचे एकूण रू ६,१०,०००/- रू किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. त्याबाबतची फिर्याद विट्ठल शिवाजी अवघडे वय. 29 वर्ष व्यवसाय-शेती /मंडप/सर्व्हिसिंग सेंटर रा.गावमाळ चोराडे ता.खटाव जि.सातारा यांनी औंध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ३८०,४६१ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर २८०/२०२३ ने अज्ञात चोरट्या इसमा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         घटनास्थळी औंध पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक डी.एस.वाळवेकर, पोलिस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे यांच्या सह टिम ने तातडीने घटनास्थळी भेट दिली.
सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ए.ठिकणे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला