लाचखोरांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नये ,दिपक कांबळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Satara News Team
- Fri 12th May 2023 03:53 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांनी जर लाच स्वीकारली तर त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.शासकीय कर्मचारी जर लाच घेताना सापडला तर त्यांचे नाव हे जाहीरपणे विविध प्रसारमाध्यमावर प्रसारित केले पाहिजे. जेव्हा शासकीय कर्मचारी सरकारी नोकरीमध्ये नियुक्त होतो तेव्हा त्याला पद -निष्ठा आणि कार्य - कर्तव्ये ,गोपनीयतेची शपथ दिली जाते.त्याप्रमाणे बरेचसे सरकारी कर्मचारी व अधिकारी वागतात देखील परंतु त्यातीलच काही रक्तपिपासू कर्मचारी व अधिकारी हे जनतेचे शोषण करतात. प्रत्येक गोष्टीला अगदी शिपायापासून ते क्लास वन अधिकारीही लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत.बरं शासनाकडून यांना गलेलठ्ठ पगार ,सरकारी निवासस्थान ,सरकारी गाडी,नोकर- चाकर,औषध उपचार सगळे मोफत असते तरीही यांना जनतेच्या पैसा स्वतःच्या घशात घालायला जरासुद्धा शरम वाटत नाही. अनेकदा यांच्या तावडीतून शेतकरीराजाही सुटत नाही. पैसे दिल्याशिवाय सहीच करत नाही .विनाकारणं व जाणून बुजून सर्वसामान्य जनतेला त्रास हे लाचखोर सरकारी नोकर करत असतात.
बऱ्याच वेळा लाचखोर कर्मचारी किंवा अधिकारी हा लाच घेतल्यानंतर लगेच जामीन घेऊन बाहेर पडतो आणि पुन्हा परत नवीन ठिकाणी लाच घेण्यासाठी सज्ज होतात.लाच खाताना यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा लाज ,भिती ,अब्रू काहीही नसते.अशी लाचखोर समाजात उजळ माथ्याने फिरत असतात.काहीही करा आमचे कोणी काही करू शकत नाही या अविर्भावात ते राहत असतात. त्यामुळे शासनाने थातूर माथूर कारवाई न करता त्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरीतून निलंबित करावे.त्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन,भत्ते,सर्व सुखसोयी शासनाने काढून घ्यावेत.अशीही मागणी दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 12th May 2023 03:53 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 12th May 2023 03:53 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 12th May 2023 03:53 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 12th May 2023 03:53 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 12th May 2023 03:53 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 12th May 2023 03:53 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 12th May 2023 03:53 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 12th May 2023 03:53 pm











