मद्यधुंद पोलिसाच्या भरधाव गाडीने दोघांना उडवलं
Satara News Team
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा : फलटणमधील तालुका आणि शहर पोलीस ठाणे म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेलाच असतो. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात माहीर असलेले फलटणमधील पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना काखेत कळसा घेऊन गावाला वळसा घालून येतील.. मात्र गुन्हेगार यांना सापडणार नाहीत. अशा फलटण पोलिसांकडून सामान्य नागरिक मात्र वारंवार भरडले जातात. अशीच एक घटना शनिवारी रात्री फलटण शहरात घडली एका मद्यधुंद पोलीस निरीक्षकाने भरधाव चारचाकी चालवून दोन युवकांना उडवल्याची घटना घडली आहे.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार याने युवकांना उडवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या अपघातात २ युवक किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर उपस्थित जमावाने पोलिसाला चांगलाच चोप दिला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या अपघाताच्या घटनेची कोणतीही नोंद फलटण पोलीस ठाण्यात झालेली नाही.
दादासाहेब पवार असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून फलटण शहर पोलीस ठाण्यातून नुकतीच त्यांची बदली सातारा कंट्रोल रूम या ठिकाणी झाली आहे. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा फलटणमध्ये येऊन रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर येथे मध्यधुंद अवस्थेत भरधाव कारने २ युवकांना उडवले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याची गाडी थांबवून तपासणी केली असता यामध्ये दारूची बाटली आढळून आली आहे. त्यानंतर संतप्त जमावाने या पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. या अपघातातील दोन्ही युवकांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही या घटनेची फलटण पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 4th Jun 2023 04:11 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 4th Jun 2023 04:11 pm












