कृषी विभाग पोहोचला बोरगाव येथील शेताच्या बांधावर
सतीश जाधव
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे बोरगांव व पंचक्रोशीतील शेतकरी यांचे करिता तालुका कृषी अधिकारी,वाई प्रशांत शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा सभा व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण दरम्यान तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी सन 2023-24 मधील येणारा खरीप हंगाम चे सविस्तर नियोजन व कार्यपद्धती प्रथमतः शेतकऱ्यांना समजावून सांगितले.तदनंतर सोयाबीन घरगुती बियाणे वापर,उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक,शेतीशाळा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी, महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, आत्मा योजना, व मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील शासकीय योजनांची जत्रा यांची सविस्तर माहिती दिली.
संग्राम पाटील विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी, भात पिकाचे पूर्व मशागत, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, एकात्मिक खत व कीड व रोग व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले.
सचिन पवार कृषी प्रर्यवेक्षक यांनी सोयाबीन पिक बीजप्रक्रिया, वान निवड, किड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना गांडूळ युनिट, नाडेप या योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सुभाष चव्हाण कृषी सहाय्यक वडोली यांनी पीक विमा व भात,सोयाबीन, व हरभरा या पिकांसाठी पिक स्पर्धा याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर सोमनाथ पवार कृषी पर्यवेक्षक यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये सन 2021 22 हंगामासाठी राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देवरे आत्मा बीटीएम यांनी व . विजय गायकवाड मंडळ कृषी अधिकारी मेनवली यांनी आभार प्रदर्शन केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 9th Jun 2023 12:56 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 9th Jun 2023 12:56 pm











