सातारा विधानसभेतील मतदान केंद्रांची पुनर्रचना करा: भारतीय जनता पार्टीची मागणी

सातारा : मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करून , मतदान केंद्रावरील मतदार संख्या कमी करा: भाजपा सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम 

मतदान केंद्रावरील त्रुटी दुरुस्त करून मतदान केंद्राची पुनर्रचना करून मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या कमी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम यांनी जिल्हाधिकारी तथा सातारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली

सातारा विधानसभेमध्ये, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४४५ मतदान केंद्र अस्तित्वात होती , एकूण मतदार ३३५७५१ इतके होते ,  त्यापैकी  २१०६५८ इतक्या  मतदारांनी मतदान केले

 लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक मतदारांच्या कडे मतदान कार्ड असूनही आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये मतदान करूनही २०२४ च्या मतदार यादी मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही , अनेक  मतदान केंद्रावर किमान दहा ते पंधरा मतदार वरील कारणामुळे मतदानापासून वंचित राहिले , एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर विभागली गेलेली होती , एकाच वस्तीतील एकाच सोसायटीतील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर होती, त्यामुळे एका मतदान केंद्रावर नावे न सापडल्याने अनेक जणांचे मतदान झाले नाही , आणि मतदानाची टक्केवारी कमी झाली , 

मतदान केंद्राचा विचार करता काही मतदान केंद्रावर पंधराशेच्या आसपास मतदार संख्या होती, यामुळे रांग लावावी  लागेल , उन्हाचा त्रास होईल या भीतीपोटी अनेक मतदारांनी मतदान केले नाही आणि मतदानाची टक्केवारी घसरली 

वास्तविक पाहता एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारणपणे एका मिनिटाचा अवधी लागतो, आपण जर ११ तास मतदानाचे धरले तरीही ६६० मतदारच व्यवस्थित मतदान करू शकतात , सातारा विधानसभेतील २५२ बुथवर ७०० च्या वर मतदार आहेत, त्याचप्रमाणे नवीन मतदान नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे

या सर्व गोष्टींचा विचार करून , एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ६५० ते ७०० च्या आत असावी, ज्या ठिकाणी मतदारांची संख्या ७०० पेक्षा जास्त आहे त्या मतदान केंद्राची विभागणी करून त्याला अ आणि ब अशी नावे द्यावीत अशी मागणी करण्यात आली

एकाच वस्तीतील एकाच सोसायटीतील नावे एकाच मतदान केंद्रावर असावीत, त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील नावे एकाच बुथवर लागोपाठ असावीत, मतदार यादी तयार करताना सोसायटीतील घर नंबर प्रमाणे आणि वस्तीतील घर नंबर प्रमाणे करावी जेणेकरून बी एल ओ यांना देखील मतदारांची पूर्ण माहिती घेणे सोपे होईल, मयत मतदारांची नावे, दुबार मतदारांची नावे यांची योग्य पडताळणी करून ती नावे कमी करावीत याबाबतही निवेदन देण्यात आले

वरील उपाय योजना करून मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात आणि यापुढे ज्या निवडणुका होतील त्यामध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले असून माननीय जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच याबाबत बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले

या वेळी भाजपा सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम
भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,  कायदा आघाडी  जिल्हाध्यक्ष ॲड सचिन तिरोडकर , जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, सातारा विधानसभा विस्तारक अविनाश खर्शीकर, सातारा तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष महेश गाडे, जावळी तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे आणि पदाधिकारी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला