राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.

पुसेसावळी येथील "त्याच" सावकारावर १५ दिवसांत दुसरा गुन्हा दाखल..

 पुसेसावळी : औंध पोलिस ठाण्यात दिनांक १७/१०/२०२५ रोजी अकस्मात मयत नंबर ४२/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गावचे हद्दीत पाळक नावचे शिवारात पिपरन च्या झाडास गळफास लावून घेऊन प्रसाद रामचंद्र उमापे, वय २४ वर्षे, रा. राजाचे कुर्ले, ता.खटाव हा मयत झालेला आहे. तरी झाले मयताचा तपास व्हावा अशा प्रकारे उमेश रघुनाथ उमापे याने दिलेल्या खबरी वरून नोंद घेण्यात आली होती. त्याच्या तपासा दरम्यान सदरची आत्महत्या ही सावकारीच्या त्रासातून झाली असल्यची माहिती संबंधित मयताच्या आज्जी ने दिल्यानंतर संबंधित सावकारा विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२५ हा दाखल करण्यात आला आहे. 

       पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तपासांतर्गत मयताची आज्जी सुगंधा अंकुश उमापे, रा. राजाचे कुर्ले यांनी १७/१०/२०२५ रोजीचे दोन वर्षापुर्वी (नक्की तारीख वेऴ माहीत नाही) माझा नातु प्रसाद रामदास उमापे रा.राजाचे कुर्ले, ता.खटाव याने मोबाईल खरेदी करणेकरीता उदय आनंदराव माऴवे, रा. वंजारवाडी, ता.खटाव याचे कडुन वीस हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते त्याचे वेऴोवेऴी व्याज परत देऊनही तो पुन्हा-पुन्हा व्याजाची रक्कम मागुन आम्ही मांग जातीचे आहे हे माहीत असतानाही माझा नातु प्रसाद यास शिवीगाऴ करुन रस्त्यात अडवुन "ऐ मांगटया माझेकडुन घेतलेल्या पैशाचे व्याज दे. नाहीतर तुला गावात राहु देणार नाही." असे म्हणुन जातीवाचक शिवीगाऴ देत होता. तसेच आम्ही पुसेसावऴी येथे गेलो असता त्या ठिकाणी ही उदय माऴवे याने माझा नातु प्रसाद यास अडवुन व्याजाचे पैसे मागुन पैसे नाही दिले तर तुला व तुझ्या घरातील लोकांना सोडणार नाही अशी धमकी दिली.तसेच पऴशी येथे माझा नातु गेला असता त्या ठिकाणी त्यास व्याजाचे पैसे मागुन व्याजाचे बदल्यात नातु प्रसाद याचेकडील  मोटर सायकल व मोबाईल काढुन घेतला होता. तसेच व्याजाचे पैसे देणेकरीता  वांरवार जातीवाचक शिवीगाऴ करुन कुटूंबाला मारण्याची धमकी देवुन त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाऴुन दिनांक १७/१०/२०२५ रोजी माझा नातु प्रसाद उमापे याने दोरीने गऴफास घेवुन मयत झाला आहे .

          उदय आनंदराव माऴवे याने माझा नातु प्रसाद यास आत्महत्या करणेस भाग पाडले म्हणुन माझी उदय आनंदराव माऴवे रा.वंजारवाडी ता.खटाव याचेविरुध्द तक्रार आहे.वगैरे मजकुरची खबर औंध पोलीस ठाणे अकस्मात मयत नं  42/2025 बी.एन.एस.एस. १९४ चे तपासादरम्यान दिलेने औंध पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२५ बी.एन.एस. कलम १०८, १२६(२), ३५२, ३५१(२), महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध अधिनियम कलम ३९, ४५, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(va), ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(Y) अंतर्गत गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रणजित एन.सावंत, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज हे करत आहेत.

             औंध चे मा.स.पो.नि. गणेश वाघमोडे यांचे सावकारीचा बिमोड करण्याच्या दिशेने वाटचाल....

          "विद्यमान कारभाऱ्यांनी पदभार स्वीकारण्या पुर्वी खाजगी सावकारी करणाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रारी देण्यासाठी औंध पोलिस ठाण्यात जाण्यासाठी पिडितांना ऐकून, समजून घेण्याची आणि पिडितांना त्यांच्या हक्काचे असलेले न्याय मिळवून देण्यासाठीची जी मानसिकता या विद्यमान अधिकाऱ्यांची दिसून येते ती नव्हती. त्यामुळे गणेश वाघमोडे यांच्या कारकिर्दीत विनाकारण कोणासही त्रास होणार नाही. यासोबतच पिडितांना योग्य तो न्याय कसा मिळणार याची तळमळ दिसून येते. त्यामुळे औंध चे कर्तव्यदक्ष मा.स.पो.नि. गणेश वाघमोडे यांची सावकारीचा बिमोड करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. परंतू पिडितांनी निर्भिडपणे अन्ययाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याची मानसिकता तयार करणे अपेक्षित आहे."

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला