झी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; तुमच्याही स्क्रिनवर असा मेसेज दिसतोय?
Satara News Team
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना चॅनेल बंद झाले आणि प्रेक्षक त्यांच्या केबल टीव्ही कनेक्शनवर स्टार स्पोर्ट्स चॅनल पाहू शकले नाहीत. याचं कारण चॅनेलने त्यांच्या किमतीत केलेली वाढ सांगितली जातेय. मात्र यामुळे केबल टीव्ही धारकांचे हाल होत आहेत.
१ फेब्रुवारी पासून झी, स्टार वाहिन्यांनी आपल्या चॅनेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यांनी नवीन नियमावली बनवून त्यावर सर्व केबल ऑपरेटर्स आणि डिश ऑपरेटर्सना स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. मात्र किमतीत वाढ झाल्याने केबल ऑपरेटर्सनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे आता झी, स्टारचे चॅनेल केबलवरून गायब झाले आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने सही न केल्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. झी, स्टारने केबलवरून आपले चॅनेल काढून घेतले आहेत. केबल ऑपरेटर्सनी सही केल्यास प्रेक्षकांना आणखी जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्याला नकार दिल्याने आता चॅनेल बंद करण्यात आले आहेत. सध्या केबल टीव्ही असणाऱ्या प्रेक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढे डिश असणाऱ्या ग्राहकांकडूनही स्टार आणि झी वाहिन्यांसाठी जास्तीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.
याचा अर्थ महिन्याच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. केबल ऑपरेटर पैसे वाढीच्या विरोधात असल्याने त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. आता यातून तोडगा निघे पर्यंत केबल असणाऱ्या प्रेक्षकांना ते चॅनेल पाहता येणार नाहीत. AIDCF ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सुधारित नवीन दर आदेशाविरोधात देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत.
दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डरच्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. AIDCF ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या सुधारित नवीन दर आदेशाविरोधात देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत. यातून तोडगा निघेपर्यंत केबल असणाऱ्या प्रेक्षकांना ते चॅनेल पाहता येणार नाहीत. या अन्यायकारक निर्णयाचा फटका ग्राहकांना बसू नये म्हणून केबल ऑपरेटर्सनी त्यावर सही करण्यास नकार दिला आहे, लवकरच यावर तोडगा काढून आम्ही आपणास पूर्ववत सेवा देऊ, तरी ग्राहकांनी केबल ऑपरेटर यांना सहकार्य करावे. असे आवाहन जीटीपीएल केबल नेटवर्कचे प्रशांत अहेरराव यांनी केले आहे.
cable
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 20th Feb 2023 06:59 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 20th Feb 2023 06:59 pm











