एशिया कपमध्ये सातारच्या शार्दुल मोहिते ला गोल्ड पदक

नागठाणे ; सहावी इंटरनॅशनल स्पर्धा मुंबई गोरेगाव येथे पार पडली या मध्ये श्री व्हेंचर शतोकाॅन कराटे क्लब महाराष्ट्र शाखा नागठाणे  शाखेचे प्रशिक्षक (सेन्साई) शार्दुल मोहिते यांनी गोल्ड पदक मिळवले त्याबद्दल त्यांची सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्रिडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शार्दुल मोहिते हा उरमोडी पुनर्वसन नागठाणे जवळ  आष्टे (जांभळेवाडी )या गावचा रहिवासी असून तो कालकथीत सखाराम कोंडिबा मोहिते गुरूजी यांचा नातू  व सामाजिक शैक्षणिक व कला क्षेत्रात अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मा.जीवन मोहिते यांचा चिरंजीव आहे. आजोबा वडील हे कुस्तीगीर असल्याने घरातील वातावरण क्रिडा क्षेत्राशी संबंधित असल्याने तीच प्रेरणा शार्दुल यांनी घेतली  अगदी वयाच्या सहाव्या वर्षी पासून  त्याने कराटे शिकायला सुरुवात केली तो नुकताच सायन्स कॉलेज सातारा येथुन बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहे.कराटे खेळा बरोबर हपकुडो बाॅक्सीगं आणि युनिफाईट  खेळ हि खेळत आहे आजपर्यंत त्यांनी तालुका.जिल्हास्तरीय राज्य स्तरीय नॅशनल इंटरनॅशनल.तसेच क्रीडा विभागाच्या शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय यश संपादन केले असून आतापर्यंत त्यांच्याकडे गोल्ड.सिल्वर बाॅझ अशी शंभर ते दीडशे पदक व प्रमाणपत्र असून तो डबल ब्लॉक बेल्ट (सेकंड दान)आहे सद्या तो (सेन्साई) अक्षय साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागठाणे व परीसरातील मुला मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे खेळा बरोबर रेफरी(पंच) म्हणून हि उत्तम काम करत असुन त्यामध्ये हि बरेच सन्मान व गौरव चिन्ह प्राप्त झाली आहेत सातारचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर निर्माण झाली आहे.त्यांच्या उत्तुंग भरारी व यशाचे सर्वांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला