मैत्रिणीपासून दूर जाण्यासाठी केला अनोखा प्रयोग.. आक्षेपार्ह संदेश प्रसारीत करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक
जुबेर शेख - Fri 1st Sep 2023 04:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा : एका इसमाचे इन्स्टाग्रामचे खाते nobixx_70 या खात्यावर १५ ऑगस्ट दिवशी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारीत करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अज्ञात इसमांचे विरुध्द दि.१५/०८/२०२३ रोजी सातारा शहर पोलीस ठाणेस गु.र.नं. ६४८/२०२३ भादविक २९५ (अ), १५३ (ब), ५०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारमाध्यमांचेवर प्रसारीत झाल्यानंतर नागरीकांच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच नमुद प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक स श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद गुन्हयाचा तपास श्री. किरणकुमार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांचेकडे वर्ग केला होता. तसेच नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग सातारा व पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार करुन त्यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्याच्या सुचना दिल्या. तपासपथकाने इन्स्टाग्रामचे खाते nobixx_70 बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्याचे सविस्तर विश्लेषन करण्यात आले आहे.
तांत्रिक माहितीच्या विश्लेषनामध्ये एका इसमाने वापरले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नमुद इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता नमुद आरोपीने सदरचे आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारमाध्यमांचेवर प्रसारीत केले असल्याची माहिती सांगीतली असून त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून मैत्रीण सोबत चॅटिंग करीत होता त्याची मैत्रीण ही अल्पवयीन यांच्यासोबत इंस्टाग्राम वर संपर्कात होती याचा राग मनात धरून आरोपी यांने अल्पवयीन युवकाचे अकाउंट आयडी घेऊन त्याच्या इन्स्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी करणारे मेसेज पोस्ट केले.. जेणेकरून त्याची बदनामी व्हावी आणि त्या शिक्षा मिळावी व तो मैत्रिणीपासून दूर व्हावा या हेतूने त्याने पोस्ट केली होती... मात्र सातारा पोलिसांनी 15 दिवसांत तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपीला अटक केलीये..
या कामी श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग सातारा श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, महेश शेटे, पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, विक्रम पिसाळ, धीरज महाडीक, मयुर देशमुख, वर्षा खोचे, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग कार्यालयाचे पोलीस अंमलदार संतोष देशमुख, चेतन बगाडे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 1st Sep 2023 04:38 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 1st Sep 2023 04:38 pm












