चोराडे फाट्यावरील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी :अपघातांची मालिका सुरूच ..

संबंधित बांधकाम विभागाच्या मस्तवाल अधिकऱ्यांची डोळेझाक प्रवाशांसाठी ठरत आहे जिवघेणी.

खटाव : खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे चौक रस्ता असून एक रस्ता पाटण- पंढरपूर तर दुसरा रस्ता विटा- महाबळेश्वर कडे जाणारा असल्यामुळे
या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक अपघात घडत आहेत, त्यामुळे आगामी कालावधीत गतिरोधक न बसवल्यास आंदोलन करण्याचा इशारा चोराडे गावचे युवा नेते श्रीकांत पिसाळ यांनी दिली आहे.
            या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग अजिबात कमी होत नाही. त्यामुळेच या ठिकाणी अनेक वेळा अपघात होताना दिसून येत आहेत.तरी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी मागणी करूनही गतिरोधक बसवण्यात आले नाहीत, गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग कमी राहत नाही, वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे अनेक वेळा समोरासमोर अपघात घडतात, अशा अपघातात अनेकांना अपंगत्व आले आहे.तरी संबंधित बांधकाम विभाग आणखीन
किती अपघातांची वाट बघणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे, तरी या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवून लोकांचे जीव वाचवावेत अशा मागणीचे पत्र संबंधित विभागास दिले असून संबंधित विभागाने या पत्राची गांभीर्याने दखल घ्यावी,अन्यथा येणाऱ्या काळात चोराडे फाटा येथे घंटा नाद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा चोराडे ग्रामस्थांनी दिला आहे.

चोराडे गावातील ग्रामस्थ गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या रस्ते बांधकाम विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना विचारत आहेत‌.राज्यासह तालुक्यातील दोन वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार सुरू असल्याने सामान्य माणसाच्या मागणीला किंमत राहिलेली नाही.त्यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार पद्धतीचा वापर सुरू आहे.त्यामुळे या ठिकाणी अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे,तरी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने गतिरोधक बसवावेत.

मा.श्रीकांत पिसाळ
युवा नेते चोराडे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला