आसनगाव येथील इटली देशातून आयात केलेल्या 75 हजार रुपये किंमतीची रेड रास्पबेरी पिकांची रोपे चोरणाऱ्या आरोपींना अटक

वाठार पोलीसांची कामगीरी

वाठार : वाठार पोलीस स्टेशन येथील हद्दीतील आसनगाव येथील एका शेतकऱ्याने इटली या देशातून भारत सरकारचे परवानगीने रेड रास्पबेरीची ५००० रोपे आणून सदर रोपांची ३ महिन्यांपूर्वी शेतात लागवड करण्यात आली होती.त्यापैकी ५० रेड रास्पबेरी रोपांची अज्ञात आरोपींनीकडून चोरी करण्यात आली याबाबत  वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सातारा समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडून अज्ञात आरोपींचा व मुद्देमालाचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.त्याप्रमाणे वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव भोसले,खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशन यांच्या मदतीने पोलिस उपनिरीक्षक संदिप बनकर, पोलिस अंमलदार प्रशांत गोरे, गणेश इथापे यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस करून आरोपींना पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.यामध्ये आरोपी महेश विठ्ठल शिंदे वय ३० रा.नगदवाडी कांदळी ता.जुन्नर व तुषार दत्तात्रय शिरोळे वय २६ रा.निंबळक  ता.नगर यांना अटक करण्यात आले आहे.आरोपींकडून शेतात लावलेली ७५००० रूपये किंमतीची रेड रास्पबेरी या फळपिकाची ५० रोपे व गुन्हात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.दाखल गुन्हाचा पुढील तपास पोलिस हवालदार दिपक साबळे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला