नागेवाडी येथे उखाना स्पर्धा संपन्न
बापू वाघ- Sat 4th Feb 2023 10:27 am
- बातमी शेयर करा
नागेवाडी : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच मराठमोळी संस्कृती जपली जावी व आजच्या पिढीला तिचे महत्व समजावे यानिमित्ताने नागेवाडी ता सातारा येथे घेण्यात आलेल्या उखाणे स्पर्धामध्ये जिल्हाभरातून शेकडो महिला व तरुण मुलींपासून जुन्या पिढीतील वयोवृद्ध महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना प्रतिसाद दिला,
नागेवाडी येथील श्री शाकंबरी देवी नवरात्रौत्सव समिती व शिवाजी खाशाबा सावंत (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)यांच्या सयुक्त विद्यमाने उखाणा स्पर्धेचे आयोजन केले होते.
देवी शाकंबरी माता व पारंपारिक उखाणे या विषयावर ही स्पर्धा आयोजित केली होती. मागे पडत चाललेली ही मराठमोळी संस्कृती जपन्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने सावंत कुटुंबीय व समितीने केला आहे. या कार्यक्रमातून सर्वोत्कृष्ट असे पाच विजेते निवडले त्यामध्ये
सौ वसुंधरा प्रदीप निकम सातारा,
सौ. सारिका प्रशांत गुजर आनेवाडी ता जावळी,सौ कलाबाई किसन शिंदे अनवडी ता वाई,सौ आरती नरेंद्र सावंत नागेवाडी ता सातारा, सौ कलाबाई पांडुरंग सावंत लिंब ता सातारा यांना पैठणी साडी,चांदीची देवीची मूर्ती व बास्केट तसेच कै.श्री. मारुती रामचंद्र सावंत (बापू)यांचे स्मरणार्थ गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत केले.
या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून सौ सीमा सावंत ,गेनबा मोझे,चौधरी सर पुणे,श्री सागर जाधव,सौ अनिता गायकवाड जयहिंद फाउंडेशन जावळी तालुका उपाध्यक्ष यांनी काम पहिले,
तर शिवाजी खाशाबा सावंत (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन),श्री दत्तात्रेय सावंत पाटील,श्री दिलीप सावंत, श्री रमेश महामूलकर, श्री विठ्ठल खंडझोडे,श्री सुखदेव सावंत, श्री उग्रसेन मतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री माजगावकर यांनी तर आभार दत्तात्रय सांवन्त यांनी मानले,
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 4th Feb 2023 10:27 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 4th Feb 2023 10:27 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 4th Feb 2023 10:27 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 4th Feb 2023 10:27 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 4th Feb 2023 10:27 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 4th Feb 2023 10:27 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 4th Feb 2023 10:27 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 4th Feb 2023 10:27 am











