मुदत ठेवीचे पैसे एका महिन्यात भेटले नाहीत तर आत्मदहन करणार : ८० वर्षाच्या गृहस्थाची आर्त हाक !

जिजामाता महिला सहकारी बँकेने एका महिन्यात मुदत ठेवीचे पैसे दिले नाहीत. तर आत्मदहन करणार असल्याचे ८० वर्षाचे राजाराम पंडीत यांनी स्पष्ट केले आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे : ६.५ लाख मुदत ठेव होती. त्यापैकी २.८० लाख आतापर्यंत भेटलेले आहेत.तेव्हा उर्वरित रक्कम मिळावी म्हणुन ८० वर्षाचे गृहस्थ पंडित काका हेलपाटे मारत आहेत.आता वयोमानानुसार त्यांना सहन होत नाही. श्री.व सौ.पंडीत दाम्पत्य आजारी असतात.त्यामुळे त्यांना पैशाची गरज अधिकची आहे. शिवाय,जे हक्काचे आहे.ते किमान वयाकडे बघून मिळावेत. अशीही याचना वारंवार कार्यालयात जाऊन त्यांनी केली  होती.आता मात्र पंडित काकांनी कार्यालयात जाऊन एका महिन्यात मुदत ठेवीची रक्कम मिळावी.अन्यथा,दि.२ डिसेंबर २०२२ रोजी कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे.याबाबतच्या निवेदनाच्या प्रति जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासह संबंधितांना दिलेल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला