महाराष्ट्रतील बार्टी आधिनस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन
Satara News Team
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
- बातमी शेयर करा
सातारा :
"बार्टी" च्या पुण्यातील मुख्य कार्यालयासह राज्यात विविध विभागांत असलेल्या कार्यालयांमध्ये बाह्य स्रोताद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेल्या दहा वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. याच्या निषेधार्थ गुरुवार पासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांना या कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बेमुदत आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असून, गुरुवारी कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते.
"बार्टी" कार्यालयात बाह्य स्रोताद्वारे सुमारे बाराशे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वाहनचालक, कार्यालय सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आस्थापना सहायक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक समतादूत, तालुका समन्वयक अशा विविध पदांवर हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये "बार्टी" मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मुक्तिभूमी येवला, बार्टी विभागीय कार्यालय नागपूर, त्याचबरोबर सर्व जिल्हास्तरीय जातपडताळणी समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
काम बंद आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील बार्टीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला असून मानधन वाढी बाबत जोपर्यंत ठाम असा शाश्वत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा निर्धार आंदोलन कर्त्यांनी केला आहे.
@satarabaarti
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 14th Feb 2025 03:31 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 14th Feb 2025 03:31 pm











