अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या कारभाराची सखोल चौकशी करणार.... विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा  ; सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या बदलीनंतर काही काळ सातारा जिल्हा परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला होता त्या कार्यकाळात महादेव घुले यांनी सरकारी अध्यादेश काढले असून त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मधील सर्व विभागातील विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार ऑनलाइन बदल्या झाल्या असताना आपल्या मर्जीतील शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाण-घेवाण करून पुन्हा नियुक्त्या करण्यात आल्या असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे..

2023-24 अंतर्गत बांधकाम विभागातील कामवाट केलेल्या कामांची व कामवाट समितीची देखील सखोल चौकशी यामध्ये करण्यात यावी, जिल्हा परिषद मध्ये असा पायंडा पडला आहे की काही ठेकेदारांना हाताशी धरून आपण स्वतः म्हणजे त्या विभागातील सक्षम अधिकारी भागीदार करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिले जात आहेत, त्याचबरोबर आरोग्य विभागातील देखील अशाच प्रकारे राजरोसपणे उघड भ्रष्टाचार सुरू आहे, शिक्षण विभागातील ऑनलाईन शासनाकडून झालेला शिक्षक बदल्यांचे परस्पर फेरफार करून तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बदल्या केल्या.. या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे अहिवळे यांनी केली आहे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
यावेळी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला