मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा देवदूत फौंडेशनचे अध्यक्ष सागर भोगांवकर यांचे मतदारांना आवाहन
Satara News Team
- Mon 6th May 2024 03:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन देवदूत फौंडेशनचे अध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी मतदारांना केले आहे.
याबाबत बोलताना भोगांवकर म्हणाले, 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल पासून 1 जून पर्यंत सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. एकूण 543 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. देश आपल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातही 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाडी करुन मतदारांना वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सूज्ञ मतदारांनी आपली मतदानाची ताकद ओळखून मतदान करुन संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवण्यामध्ये आपापली भूमिका बजवायची आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान करणे हा आपला अधिकार तर आहेच, त्याशिवाय कर्तव्यही आहे.
आपली युवा पिढी मतदानाच्या दिवशी इतर कामात व्यस्त असते. पण मतदान करणे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे. पाच वर्षांत आपण राष्ट्रासाठी पाच मिनिटं देऊ शकतो. या खेपेला पाच मिनिटं मतदानाला जरूर देऊया. कारण मतदान हा आपला आवाज आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदानाची प्रक्रिया मंगळवार दि. 7 मे रोजी संपन्न होणार आहे. मतदानाचा हा दिवस सुट्टीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी, नव मतदारांनी तसेच पालकांनी मतदानाच्या दिवशी गावी न जाता स्वत:ही मतदान करुन इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे भावनिक आवाहनही भोगांवकर यांनी मतदारांना केले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 6th May 2024 03:57 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 6th May 2024 03:57 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 6th May 2024 03:57 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 6th May 2024 03:57 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 6th May 2024 03:57 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 6th May 2024 03:57 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 6th May 2024 03:57 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 6th May 2024 03:57 pm











