"शिवतीर्थ" म्हणजे कोणीही यावे आणि टिकली मारून जावे अशी अवस्था?

गेल्या कित्येक वर्षापासून शिवतीर्थाचे काम रखडलेले आहे. या दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरच्या खर्चातून या शिवतीर्थाचं मोठं सुशोभीकरण झालं असतं. एवढे बॅनर गेल्या दोन वर्षात या ठिकाणी अनाधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत.

सातारा  : जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे गुडघ्याला स्वार्थाचे बाशिंग बांधून तयार झालेले राजकीय नवरे खूप पाहायला मिळतात. तर हेच नवरे आपल्या नेत्याची मन धरणी किंवा मनं राखण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यामागे यांचा एकच उद्देश नेत्याला खुश करणे आणि मग नेत्याला खुश करायचंय तर मग आपलं शिवतीर्थ परीसरात आहेच. कोणीही यावे आणि टिकली मारून जावे ! अशा अवस्थेत असलेलं साताऱ्यातील पवई नाक्यावरील शिवतीर्थ खरं तर या शिवतीर्थावर न्यायालयाने बॅनर लावण्यास मनाई केलेली आहे. परंतु सातारा शहरामध्ये ज्या दोन राजांचे वर्चस्व आहे या दोन्ही राजांचे बागडबिल्ले या ठिकाणी बॅनर लावून पवित्र "शिवतीर्थ" परिसराला बकाल स्वरूप देण्यास कारणीभूत होत आहेत. सामान्य माणसाने एखाद्या व्यवसायाची किंवा वाढदिवसाच्या जाहिरातीचे बॅनर केलेच आणि त्यांच्या बॅनरवर नगरपालिकेची परवानगी नसेल तर रात्री लावलेला बॅनर सकाळी उचलून नेला जातो. परंतु या चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बॅनरवर नगरपालिका का कारवाई करत नाही? असा सवाल सातारकरांनी उपस्थित केला आहे. या बॅनरच्या माध्यमातून मिळणारा महसूल हा मोठ्या प्रमाणात बुडत आहे. आत्ताचा ताजा विषय म्हणजे साताऱ्यातील दोन्ही राजां मधील घरपट्टींवरून वाद. विद्यमान आमदार म्हणतात 'नगर पालिकेने घरपट्टी वाढवून नागरिकांच्या वर मोठा बोजा लादलाय.'  तर ज्यांच्या हातात नगरपालिकेची सत्ता होती ते खासदार साहेब म्हणतात 'पैशां शिवाय नगरपालिका चालवता येत नाही' मग या बॅनरच्या माध्यमातून बुडला जाणारा महसूल या दोन्ही राजांना का दिसत नाही? यातून जनतेला एकच समजतंय ते म्हणजे सामान्य नागरिकाला एक न्याय आणि दोन्ही महाराजांच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय, यातून सामान्य जनतेने काय बोध घ्यायचा आहे तो घेत आहेच परंतु याचे पडसाद पुढील निवडणुकीच्या काळात उमटू नये हीच सदिच्छा.

 

दोन्हीही महाराजांच्या कार्यकर्त्यांना "हम करो सो कायदा" असंच वाटू लागल्याने साताऱ्यातील शिवतीर्थ परीसरात हे "कोणीही यावे आणि टिकली मारून जावे" या म्हणीप्रमाणेच फक्त नावाला शिवतीर्थ आणि कामाला दोन्ही राजांचे कार्यकर्त्यांचे बॅनर असंच झाला आहे.महाराजांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याना समज देऊन या परीसरात बॅनर लावण्यास मनाई केली पाहिजे 

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला