खेड चौकातील मॉलसह पार्किंगची चौकशी करावी. अन्यथा, दि.२२ रोजी आंदोलन छेडणार !

सातारा : खेड चौकातील सातारा टेक्सटाइल STM साडी मॉल या मिळकतीची व पार्किंगची सखोल चौकशी करून नोंद करावी.अन्यथा,दि.२२ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येणार आहे.
           सबंधित मालकाने पार्किंग ऐवजी आर्थिक फायद्यासाठी दुकान गाळे काढलेले आहेत. ते पाडून खाली पार्किंग करावे. शिवाय, बिल्डिंगच्या समोर असलेल्या दुकान गाळ्यांच्या समोर असलेले जाळीचे अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे. सातारा शहरात खेड चौकामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम झालेली आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे खेड चौक येथे असणारे सातारा टेक्सटाइल मार्केट Stm साडी मॉल हे आहे.सबंधित मालकाने TP ( Town Planning ) चे सर्व नियम धाब्यावर बसवून बिल्डिंगच्या खाली शासनाच्या नियमाप्रमाणे खाली पार्किंग करणे गरजेचे असते. परंतु तसे न करता त्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी दुकान गाळे.NH 4 हायवेच्या Tpचे नियमांचे उल्लघन करून काढलेले आहेत .ज्या प्रमाणे गोरगरिबांची हातगाडी/टपरी उचलण्यात नगरपालिका प्रशासन आपले उत्तम कार्य दाखवते. गोरगरीबांना त्रास देते.तसेच अशा मोठ्या धनदांडग्याना अतिक्रमण केले म्हणून विचारायला देखील जात नाहीत.अण्णासाहेब कल्याणी शाळे शेजारील इमारतीमध्ये सबंधित मालकाने देखील पार्किंग ऐवजी दुकान गाळे काढलेले  होते. ही बाब प्रशासनास नजरेत येताच पखालचे संपूर्ण गाळे पाडून टाकलेले आहेत.त्याबाबत प्रशासनाने अतिशय उत्कृष्टरित्या काम केलेले आहे.त्याचधर्तीवर STM साडी मॉलच्या खाली व बाजूला असणारे सर्व गाळे पाडून तेथे पार्किंग करावे.शिवाय,तेथे बिल्डिंगच्या समोर चौकोनी आकाराचे जाळीचे कंपौंड बेकायदेशीर रित्या केले आहे.तेही तत्काळ काढण्यात यावे. अन्यथा, गेली ११ महिने झाले पाठपुरावा करून देखील सबंधित मालकावर / इमारतीवर कोणतीही कारवाई होत नाही. नसल्यामुळे साहेब आपण स्वतः लक्ष घालून कारवाई करावी.अन्यथा, मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकार्त्यासमवेत आमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले आहे.तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास / उपोषण कर्त्याच्या जीवितास काही धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाद्यक्ष अशोक (बापू) गायकवाड,प्रतिक गायकवाड, आप्पासाहेब तुपे,आदित्य गायकवाड, वैभव गायकवाड, सचिन वायदंडे, अक्षय कांबळे, रवींद्र बाबर,हेमंत दोरके, सागर शिंदे,निखिल बल्लाळ.सुरेश तुपे,लक्ष्मण पोळं,सद्दाम शेख, राजू कांबळे,जावेद सय्यद,राज काकडे,सुशील गायकवाड आदी- पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला