काय शाळा...काय शेतकरी... काय नियोजन...सगळं ओक्केमधी...

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीकन्या मृणाल कुलकर्णी, वैष्णवी बाचल, प्रियदर्शनी कुंभार, गंगुताई गोरडे, श्रेया भंडारे,नेहा भागवत यांनी विशेष प्रयत्न केले.

सातारा न्यूज  खटाव : वडी ता.खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधे महाराष्ट्र कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवंगत कृषीतज्ञ, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिना निमित्त १ जुलै हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषीकन्यांकडून जि.प.प्राथ.शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला, रंगभरण याबरोबरच वृक्ष दिंडी,वृक्षारोपण हे कार्यक्रम घेऊन कृषीदिन साजरा करण्यात आला. बक्षीस वितरण करण्यासाठी गावच्या प्रथम नागरीक सरपंच सौ.वैशाली मोहीते यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, प्रकाश मोहीते, शाळा समितीचे अध्यक्ष अभिजीत येवले, मुख्याध्यापक श्रीकांत भंडारे, शिक्षकसंघाचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, सर्व शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश मोहीते यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले, त्यांनी गावामधे शेतक-यांना केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून कु.सृष्टी कदम हिने शेती आणि शेतक-यांची सद्यावस्था यावर आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक कु.मृणाल कुलकर्णी हिने केले तर सुर्यकांत कदम यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला