शेतकऱ्यांना आल्याने तारले तर कांद्याने मारले

कही खुशी, कही गम,अशी शेतकऱ्यांची अवस्था

पुसेगाव : कांदा बटाटा म्हणले सातारा जिल्ह्यातील पुसेगाव व वाठार ही बाजारपेठ अग्रगण्य मानली जाते आणि आता कांदा बटाटा बरोबरच आले ही बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जोर धरू लागली आहे. या बाजारपेठेमध्ये कांदा बटाटा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, कांदा बटाटा बियाण्यापासून ते उत्पादनापर्यंत तसेच या मालाच्या खरेदीसाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात तसेच उच्च दर्जाचे व्यवहारिक दृष्ट्या नावलौकिक मिळवलेले आहेत. त्यामुळे या बाजारपेठाचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. परंतु या भागातील बटाटा बियाण्यांच्या प्रति या बोगस निघत असल्याकारणाने व बटाटा पिकास उत्पन्न निघत नसल्याकारणाने या परिसरातील शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादन  घेणेच बंद केले असल्याचे यावर्षीचे बटाटा उत्पादनावरून दिसून येत आहे. याउलट कांदा उत्पादनात हा भाग आजही अग्रेसर असून गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये कांद्याच्या चढ-उतार भावामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तर काहींना तोटाही सहन करावा लागला आहे. आले उत्पादक शेतकरी  मात्र यावर्षी आले पिकासाठी एक गाडीसाठी 60 ते 65 हजार रुपये सोन्याचे भाव घेणार असल्याचे दिसून येत आहे.परंतु या उलट यावर्षी मात्र  कांद्याचे भाव पूर्ण गडगडले असून कांदा पाच ते सहा रुपये किलो दराने जात आहे.प्रतिक्विंटल पाचशे ते सहाशे रुपये कांदा जात असल्याने  शेतकऱ्यांनी काढलेल्या उत्पन्नापैकी लागणीला केलेल्या खर्चाचा एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च देखील निघत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असून कांदा शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढू लागला आहे.
  यावर्षी कांद्याला पोषक वातावरण असले तरी कांदा लागवडीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये कांद्याची लागण हे टप्प्याटप्प्याने मागे पुढे झालेली आहे. कांद्यास पोषक वातावरण असल्याने कांदा उत्पादन चांगल्या पद्धतीने निघत आहे. परंतु अवेळी व अवकाळी तसेच गारांच्या पडलेल्या पावसामुळे याचा खांद्यावर बऱ्याच आमची परिणाम झाला आहे. कांद्याला दर नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी कांदा दरासाठी दाबून ठेवला आहे. परंतु दर काही वाढत नसल्याकारणाने, मध्ये पडलेल्या अवकाळी व गारांच्या पावसामुळे कांदा ऐरणीवर परिणाम होऊन कांदा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा भरणी होत असताना अंदाजित 25 टक्के कांदा पाठीमागे पडत आहे. एकरी 40 ते 45 रुपये कांद्यासाठी खर्च येत असून सर्वसाधारण सव्वाशे ते दीडशे क्विंटल कांद्याचे एकरी उत्पादन निघते असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले, परंतु सध्याचा दर व दराच्या वाढीसाठी लावलेल्या ऐरणी 25% एवढ्या खराब होत असल्याने कांदा लागवडीपासून  काढणीपर्यंत व ऐरणी भरण्यापर्यंत लागलेला खर्चही निघू शकत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने ठोस मार्ग काढण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या असून या व्यापाऱ्यासाठी एक वेगळीच कांदा विक्रीसाठी व्यापार पेठ निर्माण करणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकरी तरेल अशा प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला