कळंबे येथे कृषि संजीवनी सप्ताह

कळंबे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह निमित्त खरीप हंगाम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कळंबे गावामध्ये करण्यात आले होते.यावेळी कृषि सहाय्यक श्री.तानाजी यमगर यांनी सोयाबीन व ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांनी सरीवर् टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड करावी,जेणेकरून अतिवृष्टी झाल्यास पिकाचे कमीत कमी नुकसान होईल.तसेच बियाणे निवड करताना कोणत्या बाबींचा विचार करावा याचेही मार्गदर्शन केले.
  त्याच प्रमाणे सोयाबीन टोकण करताना सर्वांनी रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया करूनच टोकण अथवा पेरणी करावी त्यामुळे किड व रोगापासून प्रतिबंध होण्यास मदत होईल असे सांगितले.सोयाबीन व ऊस पिकाच्या खत व्यवस्थापन विषयी सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
    कृषि पर्यवेक्षक श्री निखिल मोरे यांनी यावेळी कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकरी यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
    यावेळी उपसरपंच श्री प्रकाश बाबर, चेअरमन श्री.तानाजी शिवथरे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला