माण पं.स.व शिक्षण विभागाचा संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
देशभक्तीपर गीतांवर चिमुकल्यांच्या नृत्याने उपस्थितांत संचारला जोश
एकनाथ वाघमोडे- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : सातारा जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती माण व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व केंद्रातील प्राथमिक शाळांतील बालकलाकारांनी सहभाग नोंदवताना अप्रतिम नृत्याविष्कार सादर केले.
यावेळी लहान गटात तोंडले केंद्राच्या प्राथमिक शाळा दरावस्ती या शाळेने पटकावला. द्वितीय क्रमांकावर गोंदवले केंद्राच्या प्राथमिक शाळा नरवणे या शाळेने मोहर उमटवली, तर पिंपरी केंद्राच्या प्राथमिक शाळा पळशी या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला.

मोठ्या गटात म्हसवड केंद्राच्या प्राथमिक शाळा म्हसवड नं.३ने प्रथम क्रमांक पटकावल.वरकुटे मलवडी केंद्राच्या बनगरवाडीच्या प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला तर वडजल केंद्राच्या ढाकणी प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व यशस्वी केंद्र, प्राथमिक शाळा, आणि कला सादर करणाऱ्या बालकलाकारांचे प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी वितरित करून अभिनंदन केले.
यावेळी माण पं.स.चे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत, शिक्षण विस्तारअधिकारी गंबरे साहेब,लक्ष्मण पिसे,सोनाली विभूते, तर सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख व सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 22nd Aug 2022 03:32 pm











