नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल, 2 आरोपी दोषी
Satara News Team
- Fri 10th May 2024 12:37 pm
- बातमी शेयर करा
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. पाच आरोपीपैकी 2 आरोपी दोषी इतर 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुकत्ता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे यांने कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. वकील संजीव पुनाळेकरने शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला होता तसच विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. दोषी ठरवण्यात आलेले सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झालीय. 5 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या केसमध्ये पुणे पोलीस आणि सीबीआय यांनी सुरुवातीपासून वेगवेगळी थिअरी मांडली ही शोकांतिका आहे. ज्या नरेंद्र दाभोलकांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात मोहिम चालवली, त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी प्लॅनचेटचा वापर झाला हे दुर्देव आहे असा त्यांचा खटला लढवणाऱ्या वकिलाने सांगितलं.
निकालपत्र हाती आल्यानंतर अभ्यास करु व जे निर्दोष ठरलेत, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू असं दाभोलकर यांच्या वकिलाने सांगितलं. दाभोलकर यांच्या कुटुंबाने निकालावर समाधान व्यक्त केलं. पण वरच्या कोर्टात जाणार असल्याच सांगितलं.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 10th May 2024 12:37 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 10th May 2024 12:37 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 10th May 2024 12:37 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 10th May 2024 12:37 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 10th May 2024 12:37 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 10th May 2024 12:37 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 10th May 2024 12:37 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 10th May 2024 12:37 pm











