वाई एमआयडीसीत एस.डी.बी.कंपनीत २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

वाई : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एमआयडीसीतील एस.डी.बी.कंपनीत एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गणेश रघुनाथ थोरवे (वय २४ रा. व्याहळी ता.वाई) हा वरील कंपनीत नोकरीला होता. त्याने कंपनीतच आत्महत्या केल्याने वाईच्या एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. गणेश थोरवे हा या कंपनीत रात्रपाळीवर कामावर हजर होता.

या घटनेची माहिती वाई पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळावर दाखल झाले. तसेच व्याहळी गावातील नातेवाईकांसह मित्र आणि ग्रामस्थ कंपनीत पोचले.  या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. वाई पोलिसही आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला