धक्कादायक घटना; शाळेसमोरील बोळात शाळकरी मुलीवर अत्याचार, तरुणाला अटक

सातारा :  शाळेसमोरील बोळात एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

प्रथमेश पवार (वय १९, रा. डबेवाडी, ता. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १५ वर्षांची असून, संशयित प्रथमेश पवार हा घटनेदिवशी तिच्या शाळेच्या परिसरात गेला. मुलीला फूस लावून त्याने शाळेसमोरीलच बोळात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहत्या घरातही मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकाराची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने शनिवार, दि. २६ रोजी रात्री सात वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संशयित प्रथमेश पवार याच्यावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे अधिक तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला