जनता क्रांती दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
Satara News Team
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कामगार सुरक्षा मंडळ सांगलीचे अध्यक्ष आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पात्र सुरक्षारक्षकांची यादी तशीच ठेवून बेकायदेशीर भरती केली आहे. पात्र सुरक्षारक्षकांना तात्काळ नेमणूक देण्यात यावी, अशी मागणी जनता क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
उंब्रज येथील मातंग समाजातील महिलांना हक्काची घरकुले दिली जात नाहीत, यासाठी यापूर्वीही ठिय्या आंदोलन सुरू होते. या दोन्ही मागण्यांसाठी जक्रांदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सुरक्षारक्षकांची नियमित नेमणूक आणि मातंग समाजांना हक्काची घरकुले मिळावीत यासाठी जनता क्रांती दलाने उपोषणाची तीव्रता वाढवली आहे. हे उपोषण बेमुदत सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. सहाय्यक सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त यांनी या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार केला आहे. कामगार मंत्रालयाकडून लिस्ट आली नाही, असे सांगण्यात येते. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनता क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जनता क्रांती दलाचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट, सातारा जिल्हा अध्यक्ष रोहिणी लोहार, दत्ता केंगारे, अक्षय भिसे, नितीन वायदंडे, विशाल सपकाळ, विजय सोनवले आणि विशाल वायदंडे यांची उपस्थिती होती.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 13th Feb 2024 05:19 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 13th Feb 2024 05:19 pm













