महाबळेश्वर मध्ये दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
Satara News Team
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
- बातमी शेयर करा

महाबळेश्वर : गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणी मध्ये पावसाची रिमझिम आणि धुक आणि ऊन याचा लफंडाव पाहायला मिळत आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक महाबळेश्वरला भेट देऊ लागले आहेत अशातच नवीन लोकांना येथील रस्त्यांचा अंदाज न आल्याने अपघात सुद्धा घडत आहेत असाच एका अपघातात महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळील दाट धुक्याचा अंदाज न आल्याने हुंडाई क्रेटा कार थेट अंदाजे २० फुट दरीत कोसळली. सुदैवाने कोणतिही जिवीत हानी झाली नाही. मोटारीतील चालक व इतर प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ .३० दरम्यान घडली. पाऊस व दाट धुके असल्याने भारत हॉटेल पुढे महाबळेश्वर कडे येत असताना वळणाचा अंदाज न आल्यामुळे सदरची घटना घडली. वाहन दरीत कोसळून पलटी झाले सुदैवाने चालक रमेश सांळुखे रा. इस्लामपुर यांच्या सह एक पुरुष, दोन महिला व तीन लहान मुले होती. सदर वाहन क्र एम् एच् ४७ बी के ३५४० हुंडाई क्रेटा कंपनीचे आहे. सदर वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या मदत कार्यात महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस जितेंद्र कांबळे व सलिम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 12th Jun 2024 04:01 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 12th Jun 2024 04:01 pm