अवैध ताडी अड्डय़ावर पोलीसांचा छापा, १ लाख २४ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
विशाल कांबळे - Sat 6th Aug 2022 10:48 am
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण ग्रामीण पोलीसांनी अवैध ताडी अड्डय़ावर छापा टाकून सुमारे १५० लिटर ताडी जप्त करण्यात आली असून या छाप्यात १ लाख २४ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करण्यात आला आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व पोलीस हवालदार बबन रघुनाथ साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना अवैध ताडी विक्री बाबत माहिती मिळाली. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास गुणवरे ता. फलटण गावचे हद्दीत बंडा आण्णासाहेब जाधव यांचे बंद घराचे समोर हिरव्या नेटचे आडोशास संशयित अशोक इरन्ना भंडारी ( वय ४७ वर्षे राहणार गिरवी ता. फलटण ) हा त्याच्याकडे असलेली ताडी लोकांनी प्यायल्यावर त्यांना नशा येऊन आरोग्यास दुखापत होवु शकते अथवा एखादयाने जास्त पिल्याने त्यास मरण येऊ शकते, हे त्याला माहीत असताना सुध्दा तो ताड़ी बेकायदेशीररित्या २०० रुपये प्रती लिटर दराने बेकायदेशिर रित्या विक्री करीता ३५ लिटरची ३ प्लॅस्टीकचे कॅन व १५ लिटर मापाचे ३ प्लॅस्टीकचे कॅन मध्ये एकूण १५० लिटर ताडी व मोबाईल हँडसेट, स्कुटी गाडी , रोख रक्कम, साहीत्य जवळ बाळगले स्थितीत आढळून आला आहे.त्याचे विरुध्द भारतीय दंड विधान संहिता सह मुंबई दारु अधिनियम कलम 65 ( ई ) प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली असून सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहायक पोलीस फौजदार सुर्यवंशी, पोलीस हवालदार बबन साबळे, पोलीस हवालदार अमोल कर्णे, पोलीस हवालदार दिपक बडे, पोलीस काॅन्सटेबल गणेश अवघडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट या पोलीस पथकाने केली आहे.
#phaltan
#phaltanpolice
#crimenewsphaltan
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 6th Aug 2022 10:48 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 6th Aug 2022 10:48 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 6th Aug 2022 10:48 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 6th Aug 2022 10:48 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 6th Aug 2022 10:48 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 6th Aug 2022 10:48 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 6th Aug 2022 10:48 am












