शिवभक्त डॉ. श्रीकांत धुमाळ यांचे वतीने ग्रीष्म तुमकाराम भोसले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
आदिवासी समाजाचा मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा घरी येऊन दिल्या, व पारधी समाजाच्या' 67 'सदूसष्ठ कुटुंबाना अन्नधान्याचे कीट वाटप शिवभक्त डॉ श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांनी केले.
निसार शिकलगार - Wed 3rd Aug 2022 11:42 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव : दानशूर शिवभक्त डॉ श्रीकांत रामचंद्र धुमाळ महाराज यांनी दोन वर्षांपूर्वी आधीवासी पारधी समाजाच्या पन्नास कुटूंबाना दत्तक घेतले. दोन वर्ष झाले अन्नाथ आश्रम व वृद्धाश्रम जाऊन नेहमी त्या ठिकाणी दान करतात आणि दर महिन्याला वेगवेगळे प्रकारचे किट वाटप करतात, या वेळेस वेगळे काहीतरी करायच म्हणून कोळी समाज, पारधी कुटूंबाना किट वाटप करण्यात आले. ग्रीष्म या लहान मुलाचा जन्मदिवस, नागपंचमीचा दिवस, वर्षच्या पहिला सण, येथील सर्व लहान मुले व कुटुंबीय एकत्र येऊन केक कापून दहावा जन्मदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नायगाव ता हवेली जिल्हा पुणे या छोट्याश्या गावामध्ये मोठ्या उत्साह पूर्वक वातावरणात संपन्न करण्यात आला. "मुळामुठा नदी किनारी वसलेले गावात मला सेवा करण्याची संधी मिळाली तसेच मुलांना शालेय साहित्य वाटप, तसेच कुटुंबांना जीवनापयोगी वस्तूंचे किट वाटप करण्याची संधी मिळाल्याबद्दल शिवभक्त डॉक्टर श्रीकांत धुमाळ यांनी आनंद व्यक्त करून वाढदिवसाच्या मुलाला शुभेच्छा दिल्या. नायगावच्या निवास्थानी या लहान ग्रीष्मच्या वाढदिवसा साठी समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले, तसेच उपस्थित साहित्यिक भास्कर ज्ञानदेव भोसले, तुकाराम भोसले, सुजाता भोसले, शोभा भोसले,ऋतुजा राणी भोसले, स्वप्रीत भास्कर भोसले,अनिल ज्ञानदेव भोसले, माता शेवराई ज्ञानदेव भोसले, ज्ञानदेव शिलेदार भोसले, नागप्पा कोळी, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले. उपस्थित होते. यावेळी
शिवभक्त डॉ श्रीकांतजी धुमाळ वडील रामचंद्र धुमाळ यांच्या हाताने तीनशे किलो तांदूळ व तीनशे किलो गहू पन्नास पाकीट गोडतेल पन्नास किलो साखर आंघोळीचे साबण व कपडाचे साबण इत्यादी वस्तू देण्यात आल्या, डॉ श्रीकांत धुमाळ म्हणाले "मी गरीब मुलांना मदत करतो कारण या लहान मुलांनी भविष्यात मोठे होऊन कोणी अधिकारी व्हावं,तर व्यवसाय छोटे मोठे उद्योग धंदा,अनेक प्रकारचे कोर्स आहेत, या कलियुगामध्ये स्पर्धा खूप आहे या स्पर्धा मध्ये तुम्ही टिकून राहणे गरचेचे असल्याचे मत व्यक्त केले. डॉ विनायक पावसकर, दिलिप रासने, श्रीपाद सकपाळ, उपस्थित होते.
#sataranews
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 3rd Aug 2022 11:42 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 3rd Aug 2022 11:42 am











