गावकामगार तलाठी नसल्याने सर्वसामान्यांच्या कामाला कासवाची गती

As there is no talathi for the village workers, the work of the common people is slow
गायब असलेल्या गावकामगार तलाठयाच्या अनुपस्थितीत गावातील लोकांना प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्याचे काम गावाचा कोतवाल करत

दहिवडी : सोडवण्यासाठी शासनातर्फे प्रत्येक गावात गावकामगार तलाठ्याची नेमणूक केली जाते, परंतु पळशी ता.माण येथील तलाठी गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याने चर्चेला उधाण आले आहे.पळशी ता. माण या ठिकाणी कामावर रुजू असलेले गावकामगार तलाठी हे गेल्या काही महिन्यांपासून येत नसल्यापासून गावाचा कारभार गावाचे कोतवाल हेच तलाठी झाले आहेत. ग्रामस्थांच्या प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी तलाठीच उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांच्या कामाला कासवाची गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाच्या कागदोपत्री अडचणी सोडवणार कोण या सवालासह पळशी ग्रामस्थांमध्ये कुजबूज सुरू आहे. गायब असलेल्या गावकामगार तलाठयाच्या अनुपस्थितीत गावातील लोकांना प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्याचे काम गावाचा कोतवाल करत आहे, माण तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे असलेले पळशी हे गाव. या गावाला गावकामगार तलाठयाची गरज असताना ते गेल्या कित्येक महिन्यांपासून गायब आहे. याचा विचार वरिष्ठांकडून केला जाणार का आणि जर विचार केला गेला तर पळशी या गावाला नवीन तलाठी मिळणार की जुनेच तलाठी नव्याने सेवेत रुजू होणार, हे पाहणे ग्रामस्थांच्या दृष्टीने उत्सुकतेचे ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला