सातारा शहरातील सार्वजिनिक रस्त्यावर भरधाव वेगात आणि बेदरकारपणे कार चालविणाऱ्या रेकाॅर्डवरील आरोपीने थांबण्याचा इशारा केल्याने पोलिसालाच धमकी
Satara News Team
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
- बातमी शेयर करा

सातारा :गाडी थांबवण्याचा इशारा केला; रेकॉर्डवरचा आरोपी पोलिसालाच 'बघून घेतो' म्हणाला
सातारा शहरातील सार्वजिनिक रस्त्यावर भरधाव वेगात आणि बेदरकारपणे कार चालविणाऱ्या रेकाॅर्डवरील आरोपीने थांबण्याचा इशारा केल्याने पोलिसालाच धमकी दिली. तसेच शासकीय कामातही अडथळा आणला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या संबंधितावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार संतोष शेलार यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अक्षय लालासो पवार (रा. खंडोबाचा माळ, सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार शहरातील पोलिस ठाणे ते बसस्थानक मार्गावर घडला. हवालदार शेलार हे पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी बसस्थानकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पोलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील आरोपी अक्षय पवार हा कार (एमएच, ११. एएफ, १) मधून जात होता. त्याची गाडी भरधाव वेगात होती. रस्त्याच्या परिस्थितीकडे न पाहता तो बेदरकारपणे वाहन चालवत निघाला होता. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने हवालदार शेलार यांनी त्याला गाडी थांबविण्याबाबत हाताने इशारा केला. तरीही त्याने गाडी भरधाव नेली. तसेच हवालदार शेलार यांना बघून घेतो अशी म्हणून धमकी दिली. तसेच शेलार यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार जाधव हे तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 16th Feb 2024 01:50 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 16th Feb 2024 01:50 pm