डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा आरंभ साताऱ्यात होणे ही बाब इतिहासाला सुवर्णमयी बनविणारी !

सातारा: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील सांस्कृतिक विभागाच्यावतीने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.  
                     प्राचार्य डॉ.अरुण गाडे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारच्या प्रतापसिंह हायस्कूल येथे ७ नोव्हें १९०० रोजी प्रवेश घेतला होता. पुढे जागतिक स्तरावर आपल्या कार्याची मोहोर उमटविली. डॉ. आंबेडकरांचे  व्यक्तिमत्व असामान्य होते.जागतिक स्तरावर विद्वान म्हणून मिळालेली किर्ती ही गोष्ट समस्त भारतीयांना अभिमानास्पद आहे. शिक्षणाचा आरंभ साताऱ्यात होणे ही बाब सातारच्या इतिहासाला सुवर्णमयी बनविणारी आहे."
        सदरच्या कार्यक्रमास प्रा.डॉ. उषादेवी साळुंखे,प्रा.गुलाब बागवान,प्रा.सुधीर सावंत,प्रा. संभाजी नाईक तसेच  गुरुदेव, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.अझरुद्दीन पटेल यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.हेमंत कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.महेश चव्हाण यांनी आभार मानले.

 

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला