आसनगावच्या पंचक्रोशी विद्यालय होणार डिजिटल
१९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केली स्नेहमेळाव्यातून संकल्पपुर्तीला सुरुवातSatara News Team
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
- बातमी शेयर करा
गोडोली ; आसनगावच्या पंचक्रोशी विद्यालयात १९९९-२०००च्या इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचा "आठवणीतील साठवणी" स्नेहमेळावा संपन्न झाला.यावेळी उपस्थित ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपली शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात सक्षम करण्यासाठी डिजिटल स्कूल करण्यासाठी आवश्यक साहित्य भेट देऊन शाळेच्या खराब पत्रा लवकरच नवीन टाकण्यासाठी निधी संकलन करण्यास सुरुवात केली आहे.

आसनगाव परिसरातील आयुष्याच्या पाया भक्कम करणाऱ्या पंचक्रोशी विद्यालयातील१९९९-२०००च्या १०च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता.तब्बल २० वर्षांनी वर्ग मित्रांची भेट होणार असल्याने देशभरात विखुरलेले सर्व जण यावेळी आवर्जून उपस्थित होते.त्यात दुर्दैवाने निधन झालेल्या वैभव गायकवाड, सुनिल यादव, धोंडीराम गायकवाड, आशा चव्हाण यांची उणीव भासली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी बॅचमधील भारतीय सैन्य दलात कर्तत्वाची मोहर उमटवणाऱ्या दिनकर काकडे, विशाल पवार, कुंडलीत पन्हाळे यांचा सन्मान केला.
यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजीराव पवार यांच्यासह सरपंच मनोज गायकवाड, शाळेचे पहिले मुख्याध्यापक दादासाहेब साळुंखे, मुख्याध्यापक काशिद , शिक्षक संजय पाटील, सुरेश निकम, रविंद्र बर्गे, कल्याणराव भोसले, रविंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक प्रमोद काशिद , सुत्रसंचलन विक्रम मोरे, लता यादव यांनी केले.

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 2nd Nov 2022 04:16 pm











