शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत
जिल्ह्यात प्रचार सुरू; 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणातमंगेश कुंभार
- Sat 5th Nov 2022 05:43 am
- बातमी शेयर करा

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर पाटील काम पाहत आहेत. बॅंकेची रणधुमाळी तिरंगी होणार असल्याने शिक्षक सभासदांना राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षक बॅंकेसाठी लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. दि. 28 रोजी एकाने अर्ज मागे घेतला. दि. 31 रोजी 3 जणांनी, दि. 1 रोजी एकाने अर्ज मागे घेतला होता. दि. 2 रोजी आठ जणांनी अर्ज मागे घेतले. काल दि. 3 रोजी 12 जणांनी अर्ज मागे घेतले.
आज दि. 4 रोजी 12 जणांनी अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार कराड- पाटण 3, नागठाणे 3, आरळे 3, परळी 3, जावळी 2, महाबळेश्वर 2, वाई 2, खंडाळा 2, फलटण 4, गिरवी तरडगाव 3, कोरेगाव 2, रहिमतपूर 2, खटाव 2, मायणी 3, दहिवडी 3, म्हसवड 2, महिला राखीव 7, इतर मागास 3, विमुक्त जाती भटक्या जमाती 4, अनुसूचित जाती जमाती 4 असे 59 जण रिंगणात आहेत.
तालुकानिहाय बैठकांना वेग
दरम्यान, शिक्षक समिती आणि संभाजीराव थोरात गट, दोंदे गट एकत्र आला आहे. शिवाजीराव पाटील गट आणि पुस्तके गट एक झाला आहे. शिक्षक परिवर्तन पॅनेलनेही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होत आहे. या तीनही गटात राजकीय खेचाखेची होणार हे निश्चित आहे. संघ आणि समितीच्या तालुकानिहाय बैठकांना वेग आला असून बॅंकेच्या मध्यवर्ती कार्यालयात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 5th Nov 2022 05:43 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 5th Nov 2022 05:43 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 5th Nov 2022 05:43 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 5th Nov 2022 05:43 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 5th Nov 2022 05:43 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 5th Nov 2022 05:43 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Nov 2022 05:43 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Nov 2022 05:43 am