वृक्ष लागवड मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे:मा.राजेंद्र शेठ राजपुरे

महाबळेश्वर : आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. या अनुषंगाने अमृतमहोत् कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत मा. केंद्रीय कॅबिनेट सचिव यांचेद्वारे सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची दि. २२.०७.२०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेवून काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात 'मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या, याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असे मा.राजेंद्र शेठ यांनी सांगितलं
12 वर्षांपूर्वी
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाºया प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, आॅक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. म्हणूनच..... वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा.
मा.राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले वृक्ष हे जल व मृद संधारणाचे महत्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे. प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.
ग्रामपंचायत  शिलाफलक अनावरण व ध्वजारोहण व वृक्षारोपण व माजी सौनिक पत्नीचा सत्कार  वरील पत्राप्रमाणे कार्यक्रम घेणेत आले
राजपुरी गावा मध्ये ग्रामसेवक काळे साहेब,पोलीस पाटील, गावचे नागरिक उपस्तीत होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला