म्हसवड येथील सोनाराला लुटलेला जबरी चोरीचा गुन्हा उघड ४३५ ग्रॅम सोन्यासह एकूण १७ लाख, ८३ हजार, ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा,सातारा व म्हसवड पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
प्रकाश शिंदे - Wed 28th Sep 2022 02:56 pm
- बातमी शेयर करा
म्हसवड : २७ जुलै २०१२ रोजी सायंकाळी ५.२० वा. चे सुमारास तक्रारदार हे त्यांच्या मोटार सायलवरुन कासारवाडी ता.माण जि. सातारा गांवचे हद्दितून म्हसवड ते माळशिरस रोडने जात असताना श्री फार्म हाऊसच्या जवळ अचानक दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरून येवून तक्रारदार यांच्या मोटार सायकलला धड़क देवून, त्यांना खाली पाडून जखमी केले व तकादार यांना नकली पिस्तूल सारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याजवळील १५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग ओढण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रारदार बंग सोइत नसल्याने आरोपींनी बेंगचे बंद चाकूने कापून सोन्याची बंग जबरदस्तीने चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून म्हसवड पोलोस ठाणे गुरनं १५४ / २०२२ भा.दं.वि. कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
श्री अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री अजित बन्हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने उघड करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी सदर गुन्हयाचे तपासकामी सपोनि रमेश गर्ने व पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली तपास पथक तयार केले होते. सदर तपास पथकाने सातारा तसेच सोलापुर जिल्हयात जावुन गोपनीय माहिती प्राप्त केलो तसेच फिर्यादीच्या येणा-या जाणा-या मार्गावरील सी. सी. टी. व्ही. फुटेजेस तपासले. दरम्यान सदरचा गुन्हा म्हसवडमधील एका सोनाराने त्याच्या साथीदारांमार्फत केला असल्याची गोपनीय माहिती तपास पथकास प्राप्त झालो. त्या माहितीच्या आधारे अधिक माहिती काढली असता म्हसवडमधील संबंधीत सोनाराने त्याच्या माळशिरस जि. सोलापुर तसेच धुळदेव, मासाळवाडी ता. माण येथील साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची खात्री झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर संशयोतांना २१ सप्टेंबर २०२२ रोजो माळशिरस जिल्हा सोलापूर, म्हसवड जि.सातारा तसेच नालासोपारा जि. पालघर येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. त्यांना गुन्हयाचे तपासकामी म्हसवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवुन त्यांना गुन्हयात अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोट महसवड यांचेसमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपांच्या पोलीस कोठडी रिमांडचे मुदतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या पथकाने आरोपीकडे सखोल तपास करुन गुन्हयात चोरीच गेलेल्या ४६९ ग्रॅम सोन्यापैकी १४ लाख ५८ हजार २३० रुपये किमतीचे ४३५ ग्रॅम लगड स्वरुपातील सोने जात केले आहे. याशिवाय आरोपांनी गुन्हयात वापरलेली एक पांढ-या रंगाची मारुती सुझुकी k 10 कार,एक काळया रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल, गुन्हयात वापरलेले नकली पिस्टल व चाकु असा एकूण १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले

आरोपींची नांवे :
१) दुर्वा उर्फ दुर्योधन नाना कोळेकर वय ३४ वर्षे रा. धुळदेव ता.माण जि.सातारा
२) योगेश तुकाराम बरडे वय ३५ वर्षे रा. पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस ता. माळशिरस जि.सोलापूर
३) रामदास विठ्ठल गोरे वय २० वर्षे रा. म्हासाळवाडी ता.माण जि.सातारा
४) रणजित भाऊ कोळेकर वय २० वर्षे रा. धुळदेव ता.माण जि.सातारा.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 28th Sep 2022 02:56 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 28th Sep 2022 02:56 pm












