हनुमान चषक पुरुष कबड्डी स्पर्धेत विजय हनुमान मंडळ प्रथम.
किडगाव येथे 60 किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.Satara News Team
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
- बातमी शेयर करा

किडगाव : किडगाव तालुका सातारा येथे सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व विजय हनुमान मंडळाच्या वतीने 60 किलो वजनी गटासाठी पुरुषांच्या भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या हनुमान चषकाचा मानकरी किडगाव येथील विजय हनुमान मंडळाने प्रथम क्रमांक मिळवून हनुमान चषकावर आपले नाव कोरले
व रोख रकमेचे पारितोषिक मिळविले. स्वराज्य रक्षक वाई या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सदाशिवगड तालुका कराड या संघाने मिळवले. उत्कृष्ट खेळाडू विजय हनुमान मंडळाच्या अखिलेश खापे यांची निवड करण्यात आली.उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वराज्य रक्षक वाई मंडळाचा खेळाडूला पुरस्कृत करण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिव समर्थ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी तळमावले यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिव शरद कुंभार यांच्याकडून तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संकल्प दूध संघ व शिवराम इंडस्ट्रीज सातारा यांच्या वतीने देण्यात आले.सर्व चषक सातारा इलेक्ट्रॉनिक चे मालक सुधीर पवार यांच्या वतीने देण्यात आले .
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रजीत ढेंबरे, राजेंद्र शेडगे, नंदकुमार इंगवले, महेंद्रकुमार गाढवे, विनीत ढेंबरे, सुधीर पवार,अजय इंगवले, उमेश अहिरे, आदित्य इंगवले, आदम पठाण, प्रशांत इंगवले, निखिल शेडगे, आदित्य मेणकर,अभिषेक मेणकर मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 6th Feb 2024 01:40 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 6th Feb 2024 01:40 pm