पुण्याच्या बाबूराव चांदोरे फाउंडेशनला कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक- सेवागिरी चषक मानकरी

 पुसेगाव ;  प पु  श्री सेवागिरी महाराजांच्या  यात्रेनिमित्त झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुण्याच्या बाबूराव चांदोरे फाउंडेशन संघाने विजेतेपद पटकावले. 
      
      या स्पर्धेत २१ संघांनी सहभाग घेतला . प्रो कबड्डी, खेलो इंडिया तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सेवागिरी स्पोर्ट्स अकॅडमीचे अरुण मदने व आजी - माजी खेळाडू तसेच  ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव  विश्वस्त डॉ सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव  जाधव, सुसेन जाधव,राजेश देशमुख, अंकुश पाटील,संदीपकाका जाधव,तात्यासाहेब जाधव,बाबू जाधव,वैभव जाधव, बिपीन भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 
           यात्रा स्थळावर झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाला क्रीडा प्रेमींची मोठी गर्दी होती. या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात बाबूराव चांदोरे फाउंडेशन संघाने ठाणेच्या विठ्ठल क्रीडा मंडळा ला हरवून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व श्री सेवागिरी चषक पटकावला .उपविजेत्या संघाला चषक व ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे  संघाला २१ हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक जॉली स्पोर्ट्स मुंबई संघाला चषक व ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. या स्पर्धेत बेस्ट रेडर विक्रम जाधव , बेस्ट डिफेंडर सुरेश जाधव , मॅन ऑफ द मॅच आशिष पाडाळे तर बेस्ट प्लेअर चिन्मय गुरव   हे खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला