जिल्हा परिषद गट भुईंज, तालुका वाई येथे प्रभाग स्तरीय विश्व चंदिता महिला प्रभाग संघ उत्साहात स्थापन अध्यक्षपदी संगिता भोसले यांची निवड

वाई ; आजादी का अमृत महोत्सव व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' अंतर्गत मातोश्री कार्यालय भुईज जिल्हा परिषद गट भुईज येथे 'विश्व वंदिता' महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. भुईज जिल्हा परिषद गटामधील 19 ग्रामपंचायत हद्दीमधील 20 ग्राम संघाचे पदाधिकारी मिळून या प्रभाग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.याप्रसंगी भृगुऋषी महिला ग्राम संघाचे अध्यक्ष संगीता मारुती उर्फ रायाबापू भोसले यांची प्रभाग संघाच्या अध्यक्षस्थानी, सखी महिला ग्राम संघ खडकी सचिव प्रियांकाताई जाधव यांची सचिव पदी तर काळेश्वरी महिला ग्राम संघ गोवेदिगरच्या अध्यक्ष शोभाताई नवघणे यांची कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली,       त्याचबरोबर पाच उप समित्यांमध्ये प्रत्येक ग्राम संघाला प्रतिनिधित्व देण्यात आले. सदर प्रभाग संघ बांधणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी विनायक कीकले व सुनील सुळ तालुका व्यवस्थापक फलटण, वाई तालुका अभियान व्यवस्थापक पुनम गायकवाड, तालुका व्यवस्थापक सागर अभंग, सौरभ फरांदे तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक व जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन रंजनकुमार वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर ग्रामसंघ स्थापन करण्यासाठी प्रभागातील सर्व ग्राम संघाचे पदाधिकारी लिपिकताई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सदर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी ताई व आर्थिक साक्षरता ताई यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

 

सर्वांना व जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात प्रत्येक समुहाला शासनाच्या सर्व योजना पोहचवणार तसेच महिला वचत समुहांना सर्वोतोपरी न्याय देणार असे प्रतिपादन संगिता भोसले यांनी यावेळी केले. मी स्वतः महिला बचत गटातील एक सामान्य महिला असून पुढे वर्धिनी ते प्रशिक्षक अशा प्रत्येक विषयांचा अभ्यास असून यातील अभ्यासाचा उपयोग प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी काम करताना होईल असाहि विश्वास संगिता भोसले यांनी बोलून दाखविला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला