डमी आमदारांच्या वाहनावर साताऱ्यात वाहतूक पोलिसाची कारवाई

सातारा  : सातारच्या पोवई नाक्यावर हिरवे आमदार स्टिकर लावलेली आणि अंबर दिवा डॅशबोर्डवर ठेवून फिरणाऱ्या फॉरच्युनर गाडी वाहतूक पोलीस योगेश जाधव यांनी अडवली. सदरची गाडी योगेश शंकर गायकवाड यांची स्वतः ची असून त्याने मुंबई येथील एका आमदाराकडे ही गाडी असल्याची बतावणी केली. पोलिसांनी वाहनांची मुळ कागदपत्रे मागितली असता झेरॉक्स प्रती दाखवल्या. सदर इसमाने गाडीवर कारवाई होऊ नये, यासाठी फोनाफोनी करून गाडी घेऊन निघून गेला. दरम्यान सदरच्या गाडीवर अनाधिकृतपणे अंबर दिव्याच्या वापर आणि हिरवे आमदार स्टिकर लावल्यामुळे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अभिजित यादव यांनी माहिती घेऊन खात्री करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे ‘सातारा न्यूजशी  बोलताना सांगितले.

तर जिल्ह्यातील आमदारांच्या गोतावळ्यातील काही जण हिरवे आमदार स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आमरण उपोषण बसले होते.त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वायुवेग पथक अशी वाहने निदर्शनास आल्यास वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचे लेखी दिले होते.मात्र जिल्ह्यातील आमदारांच्या दबावापोटी जिल्हा पोलिसांनी ठोस काही कळविले नाही.मात्र पोवई नाक्यावर हिरवे आमदार स्टिकर लावून अंबर दिवा वापरणाऱ्या डमी आमदारांच्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला