मार्डीत शालेय मुलांनी भरविला बाजार
Satara News Team
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
- बातमी शेयर करा

दहिवडी : स्पर्धेच्या युगात मुलांना शालेय शिक्षण मिळत असले तरी बौद्धिक विकासाबरोबर व्यवहार ज्ञान मिळणे आवश्यक आहे तसेच मुलांची जिज्ञासा वाढुन गणिती कौशल्याबद्दल कार्यानुभव विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी मार्डी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीने आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .
अशा उपक्रमातून दैनंदिन व्यवहार ज्ञान व कल्पना शक्तीचा विकास होत असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रल्हाद चंदनशिवे यांनी दिली .बाजार यशस्वी करण्यासाठी दिनेश गावडे, संदीप सरतापे, रामप्रसाद कांबळे, मंगल ठोंबरे, सुरज दिवटे ,सागर नारनवर, कोमल कदम , गीतांजली देवकुळे ,सागर माने ,महादेव जाधव या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .बाजार स्टँड परिसरात भरविला असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व स्वयंसेवक यांची मदत घेण्यात आली .
बालचमुच्या बाजारात 100 हुन अधिक दुकाने लावली होती. कांदा, मिरची , टोमॅटो, गवार, वांगी ,गाजर, मुळा, मेथी , पालक इत्यादी पालेभाज्यासह अंडी, शेवचिवडा, समोसे, वडापाव , पाणीपुरी , कापडी पिशव्या अशीही दुकाने लावण्यात आली होती तर पृथ्वीराज राऊत या विद्यार्थ्यांने लावलेल्या पाणीपुरी ला अधिक पसंती मिळाली . बाजाराला पालकांसह ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता .
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 12:32 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 12:32 pm