जेवण बनवताना भाजी करपली म्हणून हातावर व मानेवर वार साताऱ्यातील घटना
Satara News Team
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
- बातमी शेयर करा
सातारा : भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या दोघा जोडीदारांमध्ये भलत्याच कारणावरून वाद झाला. जेवण बनविताना भाजी करपल्याने संतापाच्या भरात जोडीदारावर चाकूने हातावर, गळ्यावर, मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ रोजी कोडोली (धनगरवाडी), ता. सातारा येथे घडली. शुक्रराज कैलास चव्हाण (वय ४०, रा. धनगरवाडी, कोडोली) असे जखमी झालेल्याचे नावे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रराज चव्हाण आणि राजकुमार (रा. भागलपूर, बिहार) हे दोघे एकाच ठिकाणी राहतात. शुक्रराज चव्हाण हे गॅरेजमध्ये काम करतात. दि. १९ रोजी सकाळी साडेआठ वाजता ते सकाळी जेवण बनवत होते. त्यावेळी त्यांच्याकडून भाजी करपली. यामुळे संतप्त झालेल्या राजकुमारने त्यांच्यावर चाकूने उजव्या हातावर दोन वार केले. त्यानंतर गळ्यावर, मानेवरही चाकूने वार केले. यामध्ये शुक्रराज गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर राजकुमार याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अविनाश गवळी हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 22nd Feb 2024 01:13 pm












