साताऱ्यात रानडुकराची शिकार; पोलीस व वनविभागाची धावपळ पाहून शिकारी बंदूक लपून पळाले . बंदूक लागली वनविभागाच्या हाती

सातारा: शहराजवळ महादरे संरक्षण राखीव या जंगलात रविवारी रानडुकराच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. शिकारीत वापरलेली बंदूक वनविभागाच्या हाती लागली आहे. तथापि शिकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

निसर्ग संपन्न सातारा शहराला शहराच्या हद्दीवर महादरीचे जंगलात हा धक्कादायक प्रकार उघडकिस आला. महादरेच्या जंगलाला संरक्षण राखीवचा दर्जा मिळाला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच जंगलात रविवारी काही पोलीस कर्मचारी सरावाचा भाग म्हणून महादरेच्या पायऱ्या चढून यवतेश्वर नजीकच्या पठारावर निघाले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक रानडुक्कर पोलिसांना धावताना दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत रानडुकराने प्राण सोडला होता. त्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी लागली होती.

 घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका झुडपामध्ये शिकारीसाठी वापरलेली बंदूक आढळून आली. याच बंदुकीने शिकाऱ्यांनी नेम साधला असावा. पोलीस व वनविभागाची धावपळ पाहून शिकारी बंदूक लपून पळाले असावेत, असा कयास आहे. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असून बंदुकीवरून त्याच्या मालकाचा शोध सुरू असल्याचे समजते.

रानडुक्कर हे शेड्युल तीन मध्ये गणला गेलेला वन्यजीव आहे त्याची शिकार केल्याचे सिद्ध झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला