जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी.

सातारा जिल्ह्यातील ५ जवानांचे बलिदान देशासाठी बलिदान
Just remember the sacrifice of those who were martyred.

सातारा : भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात जिल्ह्यातील नाईक नारायण साळुंखे (अनपटवाडी), सुभेदार कृष्णात घाडगे (पिरवाडी), शिपाई महादेव निकम (देगाव), शिपाई शशिकांत शिवथरे (कळंबे), शिपाई गजानन मोरे (भुडकेवाडी) यांनी देशासाठी बलिदान दिले. भारताने राबवलेले ‘ऑपरेशन विजय’ ही मोहीम जवानांनी फत्ते करून पाकिस्तानला धूळ चारली. प्राणांचे बलिदान देऊन भारतमातेचे संरक्षण करणार्‍या या वीर जवानांचे स्मरण अमृत महोत्सवी वर्षात होत आहे.भारताचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे. तिन्ही बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालय अशा भौगोलिक रचनेने भारताचे संरक्षण केले आहे. मात्र तरीही या भारतभूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने अनेकदा केला. उत्तरेकडील कारगिल, लेह, लडाख परिसरात पाकिस्तानी सैनिकांनी पर्वतीय प्रदेशासह मोक्याच्या ठिकाणी कब्जा केला, बंकर बांधले. पाकिस्तानने मे 1999 मध्ये भारतासोबत युद्धाला सुरुवात केली. पाकिस्तानच्या या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन विजय’ राबवले. पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूप्रदेश बळकावला होताच; पण त्याचबरोबर सियाचीन ग्लेशियरही ताब्यात घ्यायचा मनसुबा पाकड्यांचा होता. भारतीय सैनिकांना उंच पर्वतावरील शत्रूचा मुकाबला करताना अनेक अडचणी येत होत्या. अशा खडतर परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चीत केले.देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्ह्याचे नेहमीच योगदान राहिले आहे. कारगिल युद्धात जिल्ह्यातील पाच जवानांनी प्राणांची आहुती दिली. नाईक नारायण साळुंखे (अनपटवाडी, ता. कोरेगाव), सुभेदार कृष्णात घाडगे (पिरवाडी, ता. सातारा), शिपाई महादेव निकम (देगाव, ता. सातारा), शिपाई शशिकांत शिवथरे (कळंबे, ता. वाई), शिपाई गजानन मोरे (भुडकेवाडी, ता. पाटण) हे कारगिल युद्धात देशासाठी शहीद झाले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त या शहिदांचे, वीर सुपुत्रांचे स्मरण होत आहे. ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी’, अशा शब्दांत जिल्हावासीयांकडून भावना व्यक्‍त होत आहेत.मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त) यांच्या धाडसाचे अनेक किस्से असून त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अतिरेक्यांना कापरं भरायचं. राजापूरी, ता. सातारा हे त्यांचे गाव. मारूती मोरे यांना 2003 मध्ये सेना मेडलने गौरवले होते. त्याला कारणही तसेच होते. 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये पुंछ सेक्टर येथे त्यांच्या नेतृत्वाखालील एका ऑपरेशन मोहिमेत मक्याच्या शेतात घुसून सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या या थरारक मोहिमेची दखल घेऊनच त्यांना गौरवण्यात आले होते.शांतीसेनेसाठी सैनिकाबरोबर कामलक्ष्मण मोरे यांनी मराठा बटालियनसोबत 1987 मध्ये तीन वर्षे श्रीलंका देशात शांती सेनेसाठी त्यांच्या सैनिकांबरोबर काम केले. त्यानंतर ते 2007 ते 2008 या एक वर्षासाठी युएन मध्ये शांती सेनेत सहभागी झाले होते. त्यांनी लष्करी सेवेत असताना अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत.मारूती मोरे यांच्या सैन्यदलातील कर्तबगारीचे अनेक किस्से आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांच्या अनेक मोहिमा फत्ते झाल्या आहेत. पुंछ सेक्टरमधील अराई गावालगत 29 सप्टेंबर 2001 मध्ये रात्री साडेनऊ वाजता मक्याच्या शेताजवळ जवानांनी सापळा लावला होता.तासाभरात एक अतिरेकी 100 मीटर अंतराजवळून पाऊलवाटेने जाताना दिसला. या अतिरेक्याला शरण येण्यास सांगताच अतिरेक्याने मक्याच्या शेतात लपत अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. गोळीबाराच्या आवाजावरुन शेतात अतिरेक्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आले.याचवेळी मक्याच्या शेताला वेढा देऊन एके 47 व रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने 17 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले.या मोहिमेत एकूण 14 जवान सहभागी झाले होते. ही धुमचक्री पहाटेपर्यंत सुरु होती. या तुकडीचे नेतृत्व करीत होते 5 मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त). त्यांच्या या अत्युच्च अशा धाडसी कामगिरीबद्दल राजापुरी, ता. सातारा यथील मारूती मोरे यांना 2003 मध्ये सेना मेडलने गौरवले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला