जि.प.समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांचे तात्काळ निलंबन करून त्यांनी केलेल्या गैर कारभाराची चौकशी करा ...रयतराज संघटनेचे संदीपभाऊ शिंदे
Satara News Team
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दिनांक १६ ऑक्टों रोजी जि.प. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दिव्यांग विभागाचे अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत दिव्यांगाचा मेळावा घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमांमध्ये जि.प. समाज कल्याण अधिकारी घोळवे यांना तत्काळ निलंबित करण्याच्या घोषणा दिव्यांगांकडून सभागृहात देण्यात आल्या...
साहेब ह्या महिला अधिकारी जेव्हापासून सातारा जि.प. मध्ये कामावर रुजू झाले आहेत तेव्हापासूनच समाज कल्याण विभागामध्ये भ्रष्टाचाराचा एक प्रकारे नवीन पायंडाच ह्यांनी पाडला असं म्हणायला काही हरकत नाही. शासनाने अपंग शाळांना सातवा वेतन आयोग लावला खरं पण प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दहा हजार रुपये घेऊनच, त्यामध्ये काही चांगल्या शाळांनी पैसे दिले नाहीत म्हणून आजही त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, अनेक अपंग-मूकबधिर शाळांना परवाने नूतनीकरण करण्याचे शासनाचे आदेश आहेत मात्र काही शाळांनी पैसे न दिल्यामुळे अजूनही त्यांच्या फाईल आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्या नाहीत ही सर्वात मोठी शोकांकिता आहे. मागासवर्गीय समाजाकरिता १५% रक्कम खर्च करण्याचे शासनाचे आदेश असतानाही ही रक्कम खर्च केली जात नाही मात्र कागदोपत्री ज्या लाभार्थ्यांवर या योजनेचा खर्च दाखवला आहे त्याची सुद्धा चौकशी करावी.अशी मागणी रयतराज संघटनेचे संदीपभाऊ शिंदे यांनी केली
साहेब ह्या भ्रष्टाचारी भगिनीला तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचं ताबडतोप निलंबन करावे व त्यांच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी लावावी अन्यथा दिव्यांग कर्मचारी-शिक्षक व रयतराज संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल.आसा इशारा संदीपभाऊ शिंदे यांनी या वेळी दिला या वेळी खेड ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल लोखंडे, संतोष शिंदे, उदय शिंदे, विपुल कारंडे सुशांत खंडाळे,सहील कदम,यश घनवट,सागर गव्हाळे,रोहित शिंदे उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 25th Oct 2023 05:22 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 25th Oct 2023 05:22 pm











