विधवा महिलांना हळदी- कुंकू लावून अनोखी पध्दतीने सोहळा संपन्न ;
निसार शिकलगार - Thu 25th Aug 2022 06:54 am
- बातमी शेयर करा
जिहे : सातारा जिल्ह्यातील जिहे गावी अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ;यावेळी महिलांना सन्मानित करण्यात आले; विधवा बहिणींना साडी,चोळीची रक्षाबंधन भेट देत; विधवा महिलांना हळदी- कुंकू लावून अनोखी पध्दतीने सोहळा पडला पार,]
सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील जिहे या गावी ग्रामपंचायत जिहे आणि ग्रामस्थांच्या वतीने जिहे या गावी जानाईदेवी मंदिरात महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.त्याचबरोबर गावातील महिलांनी या सोहळ्याला चांगला प्रतिसाद दिला.यासोहळ्याला विशेष मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जिहे गावचे सुपूत्र कै.सुनिल भाऊ सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी जर्नादन घाडगे गुरुजी बोलताना म्हणाले, सुनिल भाऊंनी माणसं कमावली त्यांची समाजाशी असलेली नाळ ही आम्हाला त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून समाजली.. जिहे येथील कार्यक्रमाची सुरुवात "हम होंगे कामयाब"या स्फूर्तीगीताने करण्यात आली.जिहे गावातील अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलन सोहळा उत्साहात पार पडला असून जिहे गावातील विधवा महिलांना
हळदी -कुंकू लावण्यात आले. तसेच विधवा महिलांना साडी,चोळीचे वाटपही करण्यात आले.
विशेष मान्यवरांच्या हस्ते रक्षाबंधन भेट देण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रमुख वक्त्या ॲड शैलाताई जाधव, दानशूर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद मुळे,पियूष जोशी, महिला सक्षमीकरण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षला सोनवणे यांनी महिलांना कर्तव्यासंबंधी संबोधित केले.या कार्यक्रमाला

ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समितीच्या पद्मा बर्गे , नम्रता बर्गे , सुषमा डांगे , अमोल पांढरपट्टे , महिला सक्षमीकरण फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षला सोनवणे , प्राजक्ता चव्हाण ,मंगलाधिष पाठकजी , शंकरराव फडतरे ,भगवान कुंभार , प्रल्हाद जाधव ,दिलीप जाधव , सतीश जाधव , माधव कुलकर्णी , माजी सरपंच विजया फडतरे , विठ्ठल फडतरे , तलाठी गुंजवटे आणि ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.जिहे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
जनार्दन घाडगे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले तसेच सौरभ भोईटे यांनी आभाप्रदर्शन केले
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 25th Aug 2022 06:54 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 25th Aug 2022 06:54 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 25th Aug 2022 06:54 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 25th Aug 2022 06:54 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 25th Aug 2022 06:54 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 25th Aug 2022 06:54 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 25th Aug 2022 06:54 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 25th Aug 2022 06:54 am











