पुन्हा परततोय करोना ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 4 जण केरळचे
भारतात सोमवारी कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1828 आहे.Satara News Team
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कोरोनाचा नवा व्हेरिअंट JN1 भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये धडकला आहे. हा व्हेरिअंट धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हेल्थ अॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
'गर्दी कंट्रोल करण्यासाठी पावले उचला' -
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अॅडव्हायजरीनुसार, 'तपासणीमध्ये कोरोनाच्या नवा व्हेरिअंट जेएन 1 च्या भारतातील प्रवेशाची पुष्टी झाली आहे. यामुळे सर्व राज्यांना पूर्णपणे अलर्टवर रहावे लागणार आहे. नव्या वर्षा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत गर्दी कंट्रोल करण्यासाठी योग्य ती पावले उचलावे लागतील. कोरोना प्रकरणांची आरटी पीसीआरचा वापर करून टेस्टिंग वाढवावी लागेल. सर्व प्रकारच्या तापांचे नियमितपणे मॉनिटरिंग करावे लागले. तसेच, एखाद्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास, त्याचे सॅम्पलही जिनोम सिक्वेंसिंगसाठी INSACOG LAB मध्ये पाठवण्यात यावे.'
कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने 5 जणांचा मृत्यू -
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1828 आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. मृतांमध्ये 4 जण केरळ, तर 1 उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्यू दर 1.19 टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे 335 नवे रुग्ण डिटेक्ट झाले आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Mon 18th Dec 2023 09:24 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Mon 18th Dec 2023 09:24 pm













