चाळकेवाडी येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते साडी वाटप
राजमातांकडून गावातील महिलांची आस्थेने विचारपूसSatara News Team
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा : चाळकेवाडी तालुका सातारा येथील गावातील गरजू महिलांना राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते 300 हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले जलमंदिर हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुले आहे असे आश्वासन राजमातांनी दिले यावेळी मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रंजना रावत, गीतांजली कदम, अश्विनी पुजारी रणजित घोरपडे वन विभागाचे अधिकारी तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते
चाळकेवाडी परिसरातील महिलांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केला होता त्यानुसार राजमातांच्या वतीने येतील एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते महिलांना सहावार आणि नऊवार साडी वाटप करण्यात आले . यावेळी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची राजमाता कल्पनाराजे यांनी अत्यंत आस्थेने चौकशी केली

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जलमंदिर हे सर्वसामान्य जनतेचे आहे . ते कायमच सर्वांसाठी खुले आहे आपले काही प्रश्न असल्यास आपण निश्चितच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संपर्क करू शकता . चाळकेवाडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात येते . यामुळे येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत त्यांना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे जागा मिळालेली आहे . मात्र पुनर्वसनाच्या काही तांत्रिक त्रुटी आणि सोपस्कार बाकी असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यासंदर्भात राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्याशी स्वतः संपर्क साधून आपण पाठपुरावा करू तसेच येथील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरू असे आश्वासन राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिले या महिलांना बचत गट चळवळीमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे या माध्यमातून कार्यक्रम आखण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 7th Jan 2024 04:11 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 7th Jan 2024 04:11 pm











