कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ओजस प्रवीण देवतळेस अर्जून पुरस्कार
Satara News Team
- Thu 21st Dec 2023 10:22 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील विद्यार्थी ओजस प्रविण देवतळे यास तिरंदाजी मधील भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्जुन अवॉर्ड 2023 साठी जाहीर झाला. त्याने आजपर्यंत जर्मनी येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक पुरुष गटात सुवर्णपदक प्राप्त केले. हा बहुमान मिळवणारा तो प्रथम भारतीय आहे. तसेच फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने सांघिक गटात सुवर्णपदक मिळवले. या सांघिक गटात ओजसचा समावेश होता. या यशाबद्दल संसदे मध्ये त्याचे अभिनंदन केले गेले. चीन येथे झालेल्या 19 व्या एशियन गेम्स मध्ये ओजस देवतळेने कंपाऊंड आर्चरी मध्ये वैयक्तिक पुरुष, सांघिक पुरुष आणि मिक्स सांघिक अशी 3 सुवर्णपदके मिळविली आहेत. यापूर्वी त्याने आजपर्यंत धनुर्विद्येत मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पदके आणि अनेक राष्ट्रीय पदके मिळविली आहेत, त्यात ज्युनिअर वर्ल्ड कप मधील आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदके आहेत. 19 ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान भटिंडा, पंजाब येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक अश्या दोन्ही प्रकारात प्राथमिक फेरीमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धा अजून सुरू आहेत. त्याने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याला सर्वोच्च असा अर्जुन अवॉर्ड जाहीर करून त्याचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचे हे यश कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा व रयत शिक्षण संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे असे मत विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री चंद्रकांत दळवी व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ. डी. टी शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार यांनी व्यक्त केले. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल ओजस आणि त्याचे प्रशिक्षक श्री प्रविण सावंत यांचे सर्वांनी मनापासून अभिनंदन केले. विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. डॉ विठ्ठल सावंत, प्रो. डॉ. राजन मोरे,प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रो. डॉ. रघुनाथ साळुंखे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ उदय शिंदे, डॉ हेमंत उमाप, डॉ धनाजी जाधव, सहसचिव (उच्च शिक्षण), प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे, प्रिं. डॉ भारत जाधव, प्रा. विक्रम ननावरे, प्रा. किशोर संकपाळ, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
#arjunaward
#ojasdeotale
#archery
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 21st Dec 2023 10:22 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 21st Dec 2023 10:22 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 21st Dec 2023 10:22 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 21st Dec 2023 10:22 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 21st Dec 2023 10:22 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 21st Dec 2023 10:22 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 21st Dec 2023 10:22 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 21st Dec 2023 10:22 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 21st Dec 2023 10:22 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 21st Dec 2023 10:22 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 21st Dec 2023 10:22 am













